Poco M4 Pro 5G चा आज पहिला सेल, किंमत 15000 रुपयांपेक्षा कमी

भारतात आज पोको एम 4 प्रो 5 जी (Poco M4 Pro 5G) स्मार्टफोनचा पहिला सेल आयोजित करण्यात आला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 14,999 रुपये आहे, ज्यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज उपलब्ध आहे. हा लेटेस्ट (Latest mobile phone) मोबाईल फोन गेल्या आठवड्यात भारतात लाँच करण्यात आला आहे.

Poco M4 Pro 5G चा आज पहिला सेल, किंमत 15000 रुपयांपेक्षा कमी
Poco M4 Pro 5G (Image Credit Source: Po.Co/Global)
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 2:07 PM

मुंबई : भारतात आज पोको एम 4 प्रो 5 जी (Poco M4 Pro 5G) स्मार्टफोनचा पहिला सेल आयोजित करण्यात आला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 14,999 रुपये आहे, ज्यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज उपलब्ध आहे. हा लेटेस्ट (Latest mobile phone) मोबाईल फोन गेल्या आठवड्यात भारतात लाँच करण्यात आला आहे. या मोबाइलच्या मुख्य स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, तो MediaTek डायमेंशन 810 चिपसेट, 90hz रिफ्रेश रेट, फास्ट चार्जिंग, ड्युअल कॅमेरा सेटअप आणि 8 GB पर्यंत RAM सह येईल. 15000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत (phone under 15000) येणारा हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हा फोन विविध बँकांच्या ऑफरसह उपलब्ध आहे.

Poco M4 Pro 5G ची खासियत

  1. Poco M4 Pro 5G Price : या Poco फोनची सुरुवातीची किंमत 14,999 रुपये आहे, ज्यामध्ये 4 GB RAM व्हेरिएंट येते, तर 6 GB RAM ची किंमत 16,999 रुपये आणि 8 GB RAM व्हेरिएंटची किंमत 18999 रुपये आहे.
  2. Poco M4 Pro 5G Specifications: Poco M4 Pro 5G च्या डिस्प्लेबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.6 इंचाचा डॉट डिस्प्ले आहे आणि तो 90hz च्या रिफ्रेश रेटसह येतो.
  3. Poco M4 Pro 5G Battery and fast charging: या लेटेस्ट Poco स्मार्टफोनमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जरसह येते. यात टाइप सी यूएसबी पोर्ट मिळेल.
  4. Poco M4 Pro 5G Camera Setup: या Poco मोबाईल फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे, तर सेकेंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल आहे, तर 5 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे. यात 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
  5. Poco M4 Pro 5G rivals: हा पोको स्मार्टफोन बाजारात Xiaomi Redmi Note 10 Pro, iQOO Z3 5G, Vivo Y53s, Motorola Moto G60, Samsung Galaxy A22 आणि Oppo F19s ला टक्कर देईल.

इतर बातम्या

Smartphones Under 6000k: किंमत कमी, फीचर्स दमदार, पाहा टॉप 4 स्मार्टफोन्स

Apple M2 चिपसह नवीन MacBook लाँच करणार! जाणून घ्या काय असेल खास

WhatsApp चं नवीन फीचर, डॉक्यूमेंट्स पाठवताना महत्त्वाचे दस्तऐवज सेफ राहणार

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.