नरेंद्र मोदींची सोशल मीडियावरील जादू कायम, मोदींच्या ट्विटर अकाऊंटच्या फॉलोअर्सची संख्या 7 कोटींवर

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोशल मीडियावरील जलवा अजून कायम असल्याचं समोर आलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटला 7 कोटी यूजर्सने फॉलो केलं आहे.

नरेंद्र मोदींची सोशल मीडियावरील जादू कायम, मोदींच्या ट्विटर अकाऊंटच्या फॉलोअर्सची संख्या 7 कोटींवर
PM Narendra Modi
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 10:36 PM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोशल मीडियावरील जलवा अजून कायम असल्याचं समोर आलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटला 7 कोटी यूजर्सने फॉलो केलं आहे. नरेंद्र मोदी हे जगातील सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत. सोशल मीडियावर त्यांची लोकप्रियता वाढत असल्याचं समोर आलं आहे. नरेंद्र मोदी यांनी 2009 मध्ये ट्विटर अकाऊंट वापरण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. 2010 मध्ये त्यांचे एक लाख फॉलोअर्स होते. तर, 2011 मध्ये त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 4 लाखांपर्यंत पोहोचली होती.

विविध अभियानांसाठी वापर

नरेंद्र मोदी त्यांच्या फॉलोअर्सशी संवाद साधण्यासाठी आणि राजकीय वक्तव्यांसाठी ट्विटरचा वापर करतात. नरेंद्र मोदी यांचं फेसबुक अकाऊंट असून युट्युब चॅनेल देखील आहे. नरेंद्र मोदी सोशल मीडियाद्वारे त्यांना द्यायचा असलेला संदेश त्यांच्या फॉलओर्सपर्यंत पोहोचवतात. स्वच्छ भारत अभियान, महिला सुरक्षा, यासारख्या इतर अभियानांसाठी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात केंद्र सरकारनं केलेली काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला होता. 2018 मधील आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेत्यांमध्ये पहिल्या तीनमध्ये होते.

pm modi twitter

नरेंद्र मोदी ट्विटर अकाऊंट

बराक ओबामांचे सर्वाधिक फॉलोअर्स

मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे 129.8 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाात फॉलोअर्स असल्यामुळे ओबामा पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा नंबर लागत होता. त्यांचे जवळपास 84 मिलियन फॉलोअर्स होते. मात्र, त्यांचे ट्विटर अकाऊंट बॅन करण्यात आले. त्यांतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ट्विटरवर 26.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे 19.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राअध्यक्ष जो बायडेन यांचे 30.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे ट्विटरवर 18.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.

इतर बातम्या:

ठाकरे सरकारचा निर्णयांचा धडाका, महापालिका, नगरपालिकांच्या ‘त्या’ अधिकारी कर्मचाऱ्यांना 50 लाखांचं विमा कवच

पालिका आयुक्तांच्या घराचे नळ कनेक्शन कापल्यानंतर कारवाई, मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक, 1 दिवसाची पोलीस कोठडी

औरंगाबाद

Prime Minister Narendra Modi’s Twitter account followers number cross 70 million mark

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.