पुणे पालिकेचे ‘कोविड शववाहिनी ॲप’; स्मशानभूमीतील वेटिंगपासून ते रुग्णवाहिकांच्या डिटेल्स सेंकदात मिळणार!
या अॅपवर शववाहिका उपलब्ध होणार आहेच, पण त्याचबरोबर कोणत्या स्मशानभूमीत लगेच अंत्यसंस्कार होतील याची माहितीही नातेवाईक, रुग्णालय व शववाहिकेच्या चालकाला मिळणार आहे. (Pune Municipal Corporation's 'Covid Shavavahini App'; From waiting in the cemetery to getting the details of the ambulance in seconds)
पुणे : राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला असून दररोज मृतांच्या आकड्यात वाढ पहायला मिळतेय. मृतांचे प्रमाण एवढे वाढले आहे की, अंत्यसंस्कारासाठी जागा आणि मृतदेह नेण्यासाठी अॅम्बुलन्स मिळत नाही आहे. राज्यातील महाशहरांपैकी एक असलेल्या पुण्यात कोरोनाने सरासरी दीडशे जणांचा दररोज मृत्यू होतोय. कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर शववाहिका मिळण्यापासून ते अंत्यविधीसाठी स्मशानभूमी मिळेपर्यंत नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याचे विदारक चित्र आहे. ही समस्या दूर करण्यासाठी पुणे महापालिकेने खास ‘कोविड शववाहिनी’ हे ॲप तयार केले आहे. (Pune Municipal Corporation’s ‘Covid Shavavahini App’; From waiting in the cemetery to getting the details of the ambulance in seconds)
या अॅपवर शववाहिका उपलब्ध होणार आहेच, पण त्याचबरोबर कोणत्या स्मशानभूमीत लगेच अंत्यसंस्कार होतील याची माहितीही नातेवाईक, रुग्णालय व शववाहिकेच्या चालकाला मिळणार आहे. मृतांची संख्या वाढत असताना हेल्पलाईन उपयोगी ठरत नसल्याने नातेवाईक, रुग्णालयातील कर्मचारी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा मनस्ताप कमी करण्यासाठी महापालिकेने हे ॲप तयार केले आहे.
स्मशानभूमीतील वेटिंग कमी होण्यास मदत होणार
शहरात रोज किमान 150 जणांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. त्याचा ताण निर्माण होत असल्याने हे ॲप तयार केले आहे. या ॲपमुळे नातेवाईकांची शववाहिका व स्मशानभूमी यासाठी धावाधाव बंद झालीय आहे. यामुळे स्मशानभूमीतील वेटिंगही कमी होण्यास मदत होणार आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्यावर हॉस्पिटलकडून ऑनलाईन पद्धतीने डेथपास काढला जातो. त्यासाठी आवश्यक ती माहिती त्यात भरण्यात येते. ही प्रकिया पूर्ण झाल्यावर सर्व माहिती शववाहिका अँपवर उपलब्ध होते. त्यानुसार पालिकेचे कर्मचारीच मृत रुग्णांच्या नातेवाईकाला फोन करुन माहिती देतात. याशिवाय एसएमएसद्वारे ही त्या नातेवाईकाला शवाहिकेचा नंबर, चालकाचा नंबर स्मशानभूमी, वेळ कळवली जाते.
पुणे शहरातील सर्वाधित मृत्यू ससून रुग्णालयात
पुणे शहरातील एकूण मृतांपैकी अडीच हजार बळी एकट्या ससून रुग्णालयात गेले आहेत. अडीच हजारापैकी 600 जणांचा मृत्यू हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच झाल्याची माहिती आहे. ससूनमध्ये क्रिटिकल रुग्णांना उपचारासाठी पाठवलं जात असल्यामुळे ससूनमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. सध्या 477 रुग्णांवर ससूनमध्ये उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत 6 हजार 498 जणांचा कोरोनानं बळी घेतला आहे. पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला असला तरी मृत्यूची संख्या मात्र आटोक्यात येताना दिसत नाही.
काल दिवसभरात 2538 पॉझिटिव्ह रुग्ण
पुण्यात काल दिवसभरात 2538 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात 4351 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यात करोनाबाधीत 70 रुग्णांचा मृत्यू झाला असून यापैकी 16 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. तर 1371 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 402655 इतकी आहे. एकूण ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 47420 असून आतापर्यंत एकूण 6554 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Pune Municipal Corporation’s ‘Covid Shavavahini App’; From waiting in the cemetery to getting the details of the ambulance in seconds)
वाफ घेताना पाण्यात ‘या’ गोष्टी मिसळा, होतील अनेक फायदे !https://t.co/Gynp0NSu0A #Coronaperiod | #Steam | #healthcare | #lifestyle
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 27, 2021
इतर बातम्या
कॅनरा बँकेच्या ग्राहकांसाठी खूशखबर! आता Uber राईड बुकिंगवर मिळणार भारी सूट, वाचणार एवढे पैसे
कोरोना संकटात आम्ही मूकदर्शक बनू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला 7 सवाल