Ratan Tata यांच्या इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर्सची झुंबड, पण ते या दोनच अकाऊंटला करायचे फॉलो, त्यातील एक तर आता आता केले Follow

Ratan Tata Insta Family : रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर भारतीय उद्योग विश्वाची मोठी हानी झाली. रतन टाटा हे काळाच्या पुढे होतच पण त्यांनी बदलते तंत्रज्ञान सुद्धा आत्मसात केले. इन्स्टाग्रामवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. पण रतन टाटा हे केवळ दोनच अकाऊंट फॉलो करत होते.

Ratan Tata यांच्या इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर्सची झुंबड, पण ते या दोनच अकाऊंटला करायचे फॉलो, त्यातील एक तर आता आता केले Follow
रतन टाटा या दोनच खात्यांना करायचे फॉलो
Follow us
| Updated on: Oct 10, 2024 | 2:46 PM

दिग्गज उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते अनेकांसाठी प्रेरणास्थान होते. अनेक तरुण उद्योजकांचे ते रिअल हिरो होते. त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी अनेक जण आसूसलेले असायचे. सोशल मीडियावर पण त्यांची मोठी फॅन फॉलोइंग होती. उद्योग जगतात त्यांचे अनेक चाहते होते. तसेच समाज माध्यमांवर लाखो फॉलोवर्स होते. पण ते केवळ दोनच खात्यांना फॉलो करायचे. त्यातील एक खातं तर आता आता त्यांनी फॉलो केलं होतं.

10.5 लाख फॉलोअर्स

इन्स्टाग्रामवर त्यांचे 10.5 लाख फॉलोअर्स आहेत. त्यांनी या खात्यावर आतापर्यंत 67 पोस्ट केल्या आहेत. तर ते दोन अकाऊंट फॉलो करत होते. त्यावरची शेवटची पोस्ट अशातच करण्यात आली आहे. त्यात त्यांनी प्रकृतीविषयी अफवांचे पेव फुटल्याचे म्हटले आहे. वाढत्या वयानुसार, नियमित चाचणीसाठी रुग्णालयात आल्याची माहिती त्यांनी दिली. काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये सांगितले आहे. कोणीही चुकीची माहिती पसरवू नये असे आवाहन ही त्यांनी केले.

हे सुद्धा वाचा

या दोन अकाऊंटला करायचे फॉलो

रतन टाटा यांचे इन्स्टाग्रामला लाखो फॉलोअर्स होते. पण ते दोनच खात्यांना फॉलो करत होते. त्यातील एक तर त्यांनी आता आता फॉलो केलं होतं. यामध्ये पहिले खाते टाटा ट्रस्ट या धर्मादाय संस्थेचे आहे. तर दुसरे खाते हे त्यांनी नुकतेच फॉलो केले आहे. मुंबईत मुक्या प्राण्यांसाठी विशेषतः भटक्या कुत्र्यांसाठी छोटं रुग्णालय सुरू करण्यात आलं आहे. या संस्थेच्या इन्स्टा अकाऊंटला त्यांनी फॉलो केले होते.

टाटा ट्रस्टचे मोठे काम

रतन टाटा यांचे नाव तर जगभरात त्यांच्या सामाजिक कार्य आणि देशप्रेमासाठी ओळखले जाते. आपल्या संपत्तीतील मोठ हिस्सा त्यांनी सामाजिक कार्यासाठी दान केला आहे. 1919 मध्ये टाटा ट्रस्टची (Tata Trust) स्थापना करण्यात आली. त्यावेळी 80 लाख रुपये दान करण्यात आले. टाटा ट्रस्ट ही भारतातील सर्वात जुनी सामाजिक संस्था आहे. या संस्थेमार्फत अनेक मोठ्या कामांसाठी सढळ हाताने दान देण्यात येते.

भटक्या जनावरांसाठी द्रवले हृदय

रतन टाटा हे प्राणी प्रेमी आहेत. कुत्रा हा त्यांचा लाडका प्राणी आहे. ते भर पावसात एखाद्या मोठ्या वाहनाचा अडोसा शोधतात. काही प्राणी ट्रकखाली, चारचाकी खाली आसरा शोधतात. अशावेळी प्रत्येकाने वाहन चालविण्यापूर्वी त्यांच्या चारचाकी खाली एखादा प्राणी तर नाही ना, याची खातरजमा करण्याचे आवाहन रतन टाटा यांनी केले आहे. अशा प्राण्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपाचा निवारा उपलब्ध करुन द्यावा. तशी सोय करण्याचे आवाहन पण त्यांनी केले होते.

'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.