मुंबई : रियलमीने (Realme) आज भारतात आपला लेटेस्ट Realme 9i हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. नवीन Realme फोन मागील वर्षी लॉन्च झालेल्या Realme 8i चा सक्सेसर (उत्तराधिकारी) म्हणून सादर करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या मॉडेलच्या तुलनेत Realme 9i दोन विशेष अपडेट्ससह लाँच केला आहे. ज्यामध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 SoC आणि 33W फास्ट चार्जिंगचा समावेश आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर तसेच ट्रिपल रियर कॅमेरा देखील आहे. तथापि, गेल्या वर्षीच्या मॉडेलच्या तुलनेत डाउनग्रेड म्हणून, Realme 9i मध्ये 90Hz डिस्प्ले आहे, तर Realme 8i हा फोन 120Hz रिफ्रेश रेट स्क्रीनसह बाजारात आधीच उपलब्ध आहे.
Realme 9i ची बाजारात Redmi Note 10S आणि Samsung Galaxy M32 शी स्पर्धा होईल. फोनचं हायर व्हेरिएंट Redmi Note 11T 5G ला टक्कर देईल. कनेक्टिव्हिटी पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, GPS/A-GPS, USB टाइप-C आणि 3.5mm हेडफोन जॅक समाविष्ट आहे. बोर्डवरील सेन्सर्समध्ये एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट, प्रॉक्सिमिटी सेन्सर आणि साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सरचा समावेश आहे.
भारतात Realme 9i ची किंमत 4GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंटसाठी 13,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. फोनचे 6GB + 128GB मॉडेल देखील उपलब्ध आहे ज्याची किंमत 15,999 रुपये आहे. हा फोन प्रिझम ब्लॅक आणि प्रिझम ब्लू कलर ऑप्शनमध्ये येतो. Realme 9i हा स्मार्टफोन Flipkart, Realme.com आणि देशातील ऑफलाइन किरकोळ विक्रेत्यांकडून खरेदी करता येईल. लवकरच या फोनचा सेल लाईव्ह होईल जो 22 जानेवारी रोजी फक्त Flipkart आणि Realme.com वर आयोजित केला जाईल.
ड्युअल-सिम (नॅनो) Realme 9i Android 11 सह Realme UI 2.0 वर चालतो आणि 20:1:9 आस्पेक्ट रेशो आणि 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंच फुल-एचडी+ (1,080×2,412 पिक्सेल) डिस्प्लेसह येतो. याच्या डिस्प्लेमध्ये 180Hz टच सॅम्पलिंग रेट देखील आहे आणि तो ड्रॅगन ट्रेल प्रो ग्लाससह सुसज्ज आहे. यात एक ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 SoC, Adreno 610 GPU आणि 6GB पर्यंत LPDDR4X रॅम आहे. Realme ने सॉफ्टवेअर अपडेटद्वारे Realme 9i वर डायनॅमिक रॅम विस्तार सपोर्ट सादर करण्याचे आश्वासन दिले आहे.
फोटो आणि व्हिडिओंसाठी, Realme 9i मध्ये f/1.8 लेन्ससह 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सॅमसंग सेन्सरचा समावेश असलेला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. कॅमेरा सेटअपमध्ये f/2.4 अपर्चर आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो शूटरसह 2 मेगापिक्सेल पोर्ट्रेट शूटर देखील समाविष्ट आहे. Realme 9i मध्ये f/2.1 लेन्ससह 16 मेगापिक्सेलचा Sony IMX471 सेल्फी कॅमेरा सेन्सर देखील देण्यात आला आहे.
The #realme9i is finally here!
Ultimate Performer with Snapdragon 680 6nm Processor.Starting at ₹13,999.
Early Sale on https://t.co/HrgDJTZcxv & @Flipkart at 12 PM, 22nd Jan. First Sale at 12 PM, 25th Jan.Know more: https://t.co/bJYH0xXNPC pic.twitter.com/suKtOvJQWr
— realme (@realmeIndia) January 18, 2022
Realme 9i ड्युअल स्टीरिओ स्पीकरसह येतो. यात 5,000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे जी 33W डार्ट चार्जला सपोर्ट करते. फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने हा फोन 70 मिनिटांत शून्य ते 100 टक्के चार्ज होतो.
Unboxing #NextLevelPower with the #realme9i.
Packed with:
⚡Snapdragon 680 6nm Processor
⚡33W Dart Charge
⚡Upto 11GB DREEarly Sale on https://t.co/HrgDJTHBFX & @Flipkart at 12 PM, 22nd Jan. First Sale at 12 PM, 25th Jan.
Know more: https://t.co/bJYH0xGcY4 pic.twitter.com/TNGVxDT1e1
— realme (@realmeIndia) January 18, 2022
इतर बातम्या
Honor च्या फोल्डेबल स्मार्टफोनची आजपासून विक्री सुरु, जाणून घ्या Magic V ची किंमत आणि फीचर्स
Republic Day Sale: TCL च्या किफायतशीर स्मार्ट टीव्हीवर 60 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट, पाहा यादी
OnePlus 9RT आणि OnePlus Buds Z2 बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
(Realme 9i smartphone launched in India, know price, features)