ट्रिपल कॅमेरा, दमदार प्रोसेसरसह Realme चा बजेट फोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून किंमत आणि फीचर्स

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमी (Realme) आपला परवडणारा स्मार्टफोन Realme C25s 12 जूनला लाँच करणार आहे.

ट्रिपल कॅमेरा, दमदार प्रोसेसरसह Realme चा बजेट फोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून किंमत आणि फीचर्स
Realme C25s
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 11:43 PM

मुंबई : चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमी (Realme) आपला परवडणारा स्मार्टफोन Realme C25s 12 जूनला लाँच करणार आहे. या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशनची माहिती ऑनलाइन लीक झाली आहे. बातमीनुसार, हा फोन Realme C25 सारख्या डिस्प्लेसह येईल, मात्र याचा कॅमेरा अपग्रेड केला जाणार आहे. तसेच यात अपडेटेड प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे. (Realme C25s going to launched on 12th june with triple camera, know price and features)

थायलंडमधील सर्टिफिकेशन साइट नॅशनल ब्रॉडकास्टिंग अँड टेलिकम्युनिकेशन कमिशन (NBTC) आणि रशियाच्या युरेशियन इकोनॉमिक कमिशनला (EEC) ला भेट दिल्यानंतर या फोनची वैशिष्ट्ये समोर आली आहेत. Realme C25s सर्टिफिकेशन साइटवर RMX3195 मॉडेल नंबरसह नोंदणीकृत आहे. GizChina ने या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन उघड केले असून 12 जूनला हा फोन चीनमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

Realme C25s ची किंमत

Realme C25s च्या 4GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 170 डॉलर्स (जवळपास 12,300 रुपये) इतकी असू शकते. याशिवाय कंपनी हा फोन चीनसह भारतामध्येही सादर करू शकते, अशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. तथापि, भारतात या स्मार्टफोनची किंमत किती असेल याबद्दल अद्याप काहीही सांगण्यात आलेलं नाही.

Realme C25s चे स्पेसिफिकेशन्स

या फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास या फोनला 6.5 इंचाचा एचडी + डिस्प्ले मिळेल, ज्याचं रिझोल्यूशन 720X1600 पिक्सल इतकं असेल. यासह या फोनमध्ये वॉटरड्रॉप स्टाईल नॉच देता येईल. या व्यतिरिक्त त्यामध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलीओ G58 SoC प्रोसेसर मिळेल. यापूर्वी रिअलमी सी 25 मध्ये मीडियाटेक हेलिओ G70 प्रोसेसर देण्यात आला होता. हा फोन 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येईल, याची स्टोरेज स्पेस मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येईल.

कॅमेरा

Realme C25s मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर असेल. सोबत यामध्ये 2-2 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे असू शकतात. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या

दमदार प्रोसेसर आणि डिस्प्लेसह Realme X7 Max 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

लाँचिंगपूर्वीच Samsung Galaxy Tab S8 ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या काय असेल खास?

OnePlus चा किफायतशीर स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Realme C25s going to launched on 12th june with triple camera, know price and features)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.