12GB/256GB, 64MP ट्रिपल कॅमेरा, Realme चा जबरदस्त फोन बाजारात, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

बहुप्रतिक्षित स्मार्टफोन Realme GT NEO 2 अखेर भारतात लाँच झाला आहे. Realme GTNEO2 मध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी आहे. स्नॅपड्रॅगन 870 5G प्रोसेसरवर चालणाऱ्या कोणत्याही स्मार्टफोनमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी आहे.

12GB/256GB, 64MP ट्रिपल कॅमेरा, Realme चा जबरदस्त फोन बाजारात, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
Realme GT Neo 2
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 6:55 PM

मुंबई : बहुप्रतिक्षित स्मार्टफोन Realme GT NEO 2 अखेर भारतात लाँच झाला आहे. Realme GTNEO2 मध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी आहे. स्नॅपड्रॅगन 870 5G प्रोसेसरवर चालणाऱ्या कोणत्याही स्मार्टफोनमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी आहे. (Realme GT Neo 2 sale live on flipkart)

Realme GTNEO2 हा डायमंड थर्मल-जेल वापरण्यात आलेला जगातील पहिला स्मार्टफोन आहे. त्यात 20% डायमंड डस्ट असते, कारण हिरा हा इतर मटेरियलपेक्षा उत्तम थर्मल कंडक्टिव्ह मटेरियल आहे, ज्यामुळे 50% अधिक हीट ट्रान्सफर होते. या विशिष्ट्यामुळे हा फोन गेमिंगसाठी उत्तम असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

Realme GT NEO 2 स्नॅपड्रॅगन 870 5G प्रोसेसरसह 4 Kryo 585 CPU द्वारे समर्थित आहे, जे 3.2Ghz वर परफॉर्म करते. फोटोग्राफीसाठी यामध्ये सर्वोत्तम कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. प्रत्येक क्षण कॅप्चर करण्यासाठी, डिव्हाइसमध्ये 64 एमपी मेन कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सज्ज आहे.

रियलमी जीटी नियो 2 चे स्पेसिफिकेशन्स

Realme GT Neo 2 मध्ये 6.62-इंच सुपर AMOLED डिस्प्ले 120hz स्क्रीन रिफ्रेश रेट, 92.6 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो आणि 600 हर्ट्ज सॅम्पलिंग रेट, HDR10+ देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 12GB पर्यंत RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेजसह येतो. यात 7GB अतिरिक्त व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देखील समाविष्ट आहे.

Realme GT Neo 2 ची किंमत आणि उपलब्धता

Realme GT Neo दोन व्हेरिएंटमध्ये येतो याच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 35,999 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, रियलमी डॉट कॉम आणि ऑफलाइन स्टोअर्सवर देशभर उपलब्ध झाला आहे.

इतर बातम्या

स्ट्राँग बॅटरी, रिव्हर्स चार्जिंगसह Vivo Y3s (2021) भारतात लाँच, किंमत 9499 रुपयांहून कमी

दमदार प्रोसेसर, फास्ट चार्जरसह Realme चे दोन स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

Samsung ची विक्री जैसे थे, तरीही ठरला जगातील अव्वल स्मार्टफोन ब्रँड, Apple, Xiaomi ला पछाडलं

(Realme GT Neo 2 sale live on flipkart, know price and features)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.