256 GB स्टोरेज, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह Realme चा शानदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स

Realme GT Neo 2 हा चीनी ब्रँडचा लेटेस्ट प्रीमियम फोन आहे जो सध्या चर्चेत आहे. चिनी टेक कंपनीने आपल्या लेटेस्ट GT सिरीजमधील स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे.

256 GB स्टोरेज, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह Realme चा शानदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 4:34 PM

मुंबई : Realme GT Neo 2 हा चीनी ब्रँडचा लेटेस्ट प्रीमियम फोन आहे जो सध्या चर्चेत आहे. चिनी टेक कंपनी Realme ने आपल्या लेटेस्ट GT सिरीजमधील स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे. जीटी निओ 2 नवीन कॅमेरा डिझाइनसह येतो जो आपण वनप्लस नॉर्ड 2 वर पाहू शकता. जीटी निओ 2 ब्लॅक मिंट रंगात येतो, जो निऑन ग्रीन आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन आहे. (Realme GT Neo2 launched with Snapdragon 870 and improved cooling)

रिअलमीच्या लेटेस्ट फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. हा प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 865 ची थोडी सुधारित आवृत्ती आहे जी गेल्या वर्षीच्या स्मार्टफोनसाठी फ्लॅगशिप प्रोसेसर होती. याचा अर्थ असा की ग्राहकांना या फोनच्या परफॉर्मन्सबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही, कारण परफॉर्मन्सच्या बाबतीत हा फोन टॉप-क्लास असेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

किंमती

  • 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हर्जनची किंमत CNY 2,499 (अंदाजे 28,500 रुपये) आहे.
  • 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हर्जनची किंमत CNY 2,699 (अंदाजे 30,700 रुपये) आहे.
  • 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हर्जनची किंमत CNY 2,999 (अंदाजे 34,200 रुपये) आहे.

भारतात लाँचिंग कधी?

Realme लवकरच भारतात GT Neo 2 लाँच करेल अशी अपेक्षा आहे. रियलमी इंडिया आणि युरोपचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव सेठ यांनी अलीकडेच अजून एका जीटी-सीरिज फोनचे नाव न घेता भारतात टीझ केले आहे. जीटी मास्टर एक्सप्लोरर आवृत्ती येत नसल्याने, जीटी निओ 2 येण्याची दाट शक्यता आहे. भारतात Realme GT Neo 2 ची किंमत अंदाजे 30,000 रुपये असू शकते.

फीचर्स

Realme GT Neo 2 मध्ये 6.62 इंचाचा फुल HD+ E4 AMOLED डिस्प्ले, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन, 600Hz चा टच सॅम्पलिंग रेट, 1300nits ची पीक ब्राइटनेस आणि DC dimming सपोर्टसह येईल. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. डिस्प्लेच्या डाव्या बाजूला पंच-होल कटआऊट आहे आणि त्याच्या आत 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. GT Neo 2 मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर आहे जो 12GB पर्यंत RAM आणि 256GB इंटर्नल स्टोरेजसह जोडलेला आहे. यात मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट देखील आहे.

GT Neo 2 च्या मागील बाजूस तीन कॅमेरा सेन्सर आहेत, त्यात 64 मेगापिक्सलचा मुख्य, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल सेन्सर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. Realme GT Neo 2 मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. चार्जिंग आणि ऑडिओ आउटपुटसाठी फोनमध्ये यूएसबी-सी पोर्ट आहे. जीटी निओ 2 वाय-फाय 6 ला सपोर्ट करतो.

इतर बातम्या

Apple iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max च्या भारतीय खरेदीदारांना धक्का, शिपिंग उशिरा होणार

स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरसह 27 सप्टेंबरला ढासू स्मार्टफोन लाँच होणार, जाणून घ्या दमदार फीचर्स

र्षअखेर Google Pixel Fold लाँच होणार, LTPO OLED डिस्प्लेसह सुसज्ज डिव्हाईस

(Realme GT Neo2 launched with Snapdragon 870 and improved cooling)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.