12GB रॅम, 5000mAh बॅटरीसह Realme चा नवीन स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

रियलमी (Realme) या चिनी स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने आपल्या V सिरीज अंतर्गत नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने या फोनचे नाव रियलमी व्ही 23 (Realme V23) असे ठेवले आहे.

12GB रॅम, 5000mAh बॅटरीसह Realme चा नवीन स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Realme V23 Image Credit source: gizmochina
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 12:47 PM

मुंबई : रियलमी (Realme) या चिनी स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने आपल्या V सिरीज अंतर्गत नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने या फोनचे नाव रियलमी व्ही 23 (Realme V23) असे ठेवले आहे. या स्मार्टफोनमध्ये octa-core MediaTek Dimensity 810 प्रोसेसर दिला आहे. ज्यामध्ये 6.58 इंचांची स्क्रीन आणि 48 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. Realme V23 दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB पर्यंत रॅम देण्यात आला आहे. यासोबत 256GB पर्यंत इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. दुसऱ्या (टॉप व्हेरिएंट) पर्यायात 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज स्पेस मिळेल. Realme V23 सध्या चीनमध्ये लॉन्च झाला आहे. त्याची विक्रीही सुरू झाली आहे. मात्र हा फोन भारतात कधी लाँच (India Launch) करणार याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

या फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 1,699 युआन (जवळपास 20,300 रुपये) आहे. तर त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 1,899 युआन (जवळपास 22,700 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा हँडसेट ग्लास मॅजिक आणि ग्रेव्हल ब्लॅक कलर पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Realme V23 चे स्पेसिफिकेशन्स

Realme V23 मध्ये 6.58-इंचाची FHD + IPS LCD स्क्रीन आहे. त्याचे पिक्सेल रिझोल्यूशन 2408×1080 पिक्सेल आहे. यामध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 12GB पर्यंत रॅम आहे. या स्मार्टफोनमध्ये Octa-core MediaTek Dimensity 810 प्रोसेसर देण्यात आला आहे.

याशिवाय यामध्ये 256GB पर्यंत इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर याच्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 48-मेगापिक्सलचा आहे. यासोबत 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा यात देण्यात आला आहे.

फोनच्या पुढील बाजूस सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरही आहे.

इतर बातम्या

वरळीतील अलिशान अपार्टमेंटची 144 कोटींना विक्री; आयनॉक्स समूहाचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन यांनी केली खरेदी

GST स्लॅबमध्ये लवकरच मोठ्या बदलाची शक्यता; ‘अशी’ असेल नवी रचना

Textile | कापड उद्योगाला सरकारचे पाठ’बळ’ ! प्रोत्साहन योजनेत 61 प्रस्तावांना मंजुरी; 2.4 लाख नोकऱ्यांचा राजमार्ग तयार

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.