AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिअलमीचे दोन स्मार्टफोन अन्‌ एक स्मार्ट वॉच होणार लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

लवकरच रिअलमीचे दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. कंपनी भारतीय बाजारात दोन नवीन 5G फोन तसेच एक स्मार्ट वॉच लाँच करण्याचा विचार करत आहे. अपकमिंग रिअलमी स्मार्टफोनच्या फीचर्सबाबत या लेखातून माहिती जाणून घेणार आहोत.

रिअलमीचे दोन स्मार्टफोन अन्‌ एक स्मार्ट वॉच होणार लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
Realme file photoImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 1:19 PM

रिअलमी (Realme) लवकरच नवीन बजेट स्मार्टफोन (smartphones) लाँच करणार आहे. कंपनी Realme Techlife Watch SZ100 ही स्मार्ट वॉच (smart watch) आणि Realme Narzo 50 5G मालिकेसह लाँच करण्याची शक्यता आहे. दोन्ही डिव्हाइसेस 18 मे रोजी व्हर्च्युअल इव्हेंटद्वारे लाँच केले जातील. या महिन्याच्या अखेरीस या प्रोडक्टची विक्री सुरू होईल, अशी शक्यता आहे. कंपनीने या डिव्हाईसची मायक्रो साइटदेखील लाईव्ह केली असून त्यावर त्यांची वैशिष्ट्ये आणि डिझाइनची माहिती ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

कोठून खरेदी कराल?

तुम्ही Amazon वरून Realme Narzo 50 5G सीरिज खरेदी करु शकणार आहात. कंपनीने सांगितले आहे, की या सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन असतील, Nrazo 50 5G आणि Narzo 50 Pro 5G. MediaTek Dimensity 920 चिपसेट यापैकी एका मॉडेलमध्ये उपलब्ध असेल. ग्राहक हा कार्यक्रम लाईव्ह पाहू शकणार आहेत. 18 मे रोजी दुपारी 12.30 वाजता कार्यक्रम सुरू होणार असून रिअॅलिटीच्या सोशल मीडिया हँडल्सवर हा कार्यक्रम लाईव्ह असेल.

काय असतील वैशिष्ट्ये?

एका रिपोर्टनुसार, Narzo 50 5G ला 6.6 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले मिळेल. हा स्मार्टफोन डायमेंसिटी 810 प्रोसेसर आणि 128GB स्टोरेजसह येईल. फोनमध्ये 4GB रॅम आणि 6GB रॅमचा पर्याय मिळेल. हँडसेट ड्युअल रियर कॅमेरासह येईल, ज्याची मुख्य लेन्स 48MP असेल आणि सेकंडरी लेन्स 2MP असेल. समोर 8MP कॅमेरा दिला जाऊ शकतो. त्याची किंमत सुमारे 14 हजार रुपये असेल.

प्रो व्हेरिएंटची स्पेसिफिकेशन्स

त्याच वेळी, प्रो व्हेरिएंटमध्ये 6.4 इंचाचा डिस्प्ले उपलब्ध असेल. हँडसेट डायमेंसिटी 920 प्रोसेसरवर काम करेल. यात 128GB स्टोरेज मिळू शकते. दरम्यान, यूजर्सना 6GB रॅम आणि 8GB रॅमचा पर्याय मिळेल. मागील बाजूस 48MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल. या व्हेरियंटची किंमत 22 हजार रुपये असू शकते. या दोन हँडसेटसह, कंपनी Realme TechLife Watch SZ100 देखील बाजारात आणणार आहे. त्याला 1.69 इंचाची स्क्रीन आणि 12 दिवसांच्या बॅटरी लाईफ असणार आहे.

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.