कमी किंमत आणि 6000mAh बॅटरीसह Redmi 10 Prime भारतात लाँच

Xiaomi ने आपला परवडणारा स्मार्टफोन Redmi 10 Prime आज भारतात लाँच केला आहे. यासह, कंपनीने TWS Redmi Earbuds 3 Pro देखील लाँच केले आहेत.

कमी किंमत आणि 6000mAh बॅटरीसह Redmi 10 Prime भारतात लाँच
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 5:59 PM

मुंबई : Xiaomi ने आपला परवडणारा स्मार्टफोन Redmi 10 Prime आज भारतात लाँच केला आहे. यासह, कंपनीने TWS Redmi Earbuds 3 Pro देखील लाँच केले. हा स्मार्टफोन देशात दोन रॅम कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे आणि त्यांची किंमत 12,499 रुपयांपासून सुरू होते. रेडमी 10 प्राइम हे रेडमी 10 चे रीब्रँडेड व्हर्जन आहे जे नुकतेच जागतिक बाजारात लाँच केले गेले. तथापि, जागतिक व्हेरिएंटच्या तुलनेत हा फोन 5000mAh बॅटरीऐवजी 6000mAh बॅटरीसह लाँच करण्यात आला आहे. (Redmi 10 Prime launches in India with low price and 6000mAh battery)

भारतात Redmi 10 Prime ची किंमत 12,499 रुपयांपासून सुरू होते, यामध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट ऑफर करण्यात आलं आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने या व्हेरिएंटची इंटर्नल स्टोरेज स्पेस 1TB पर्यंत वाढवता येते. फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,499 रुपये आहे. या मॉडेलचे स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येते. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड आणि ईएमआय वापरून ग्राहक या फोनवर 750 रुपयांची सूट मिळवू शकतात. Mi.com, Amazon India आणि ऑफलाइन रिटेलर्सवर 7 सप्टेंबरपासून फोनची विक्री सुरू होईल.

खास फीचर्स

आपल्याला या फोनमध्ये पॉली कार्बोनेट रियर पॅनेल मिळते. हा फोन 6.5-इंच फुल एचडी+ डिस्प्लेसह येतो आणि 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण देण्यात आले आहे. फोनमध्ये MediaTek Helio G88 SoC देण्यात आला आहे. हा फोन MIUI 12.5 आधारित Android 11 वर काम करतो.

फोन 6000mAh बॅटरी पॅक सह सादर करण्यात आला आहे आणि 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनसोबत 22.5W चा फास्ट चार्जर देखील उपलब्ध आहे. डिव्हाइसला 9W रिव्हर्स वायर्ड चार्जिंग देखील मिळते.

इतर बातम्या

आयफोनप्रेमींसाठी वाईट बातमी, Apple iPhone 13 मधलं ‘महत्त्वाचं’ फीचर भारतात चालणार नाही

8000 रुपयांच्या रेंजमध्ये Realme चा ढासू स्मार्टफोन बाजारात, लो बजेटमध्ये 5000mAh बॅटरीसह ट्रिपल कॅमेरा

रिलायन्स जिओ Disney+ Hotstar प्रीपेड प्लॅन्स बदलणार, जाणून घ्या कसे असतील नवे प्लॅन्स

(Redmi 10 Prime launches in India with low price and 6000mAh battery)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.