AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Redmi Smart Band Pro बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

स्मार्टवॉच आणि स्मार्ट बँड भारतासह जगभरात लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे अनेक स्मार्टफोन कंपन्या भारतीय बाजारात ठराविक अंतराने नवनवीन स्मार्टवॉच आणि स्मार्टबँड लाँच करत आहेत.

Redmi Smart Band Pro बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास
Redmi Smart Band Pro
Follow us
| Updated on: Nov 30, 2021 | 3:09 PM

मुंबई : स्मार्टवॉच आणि स्मार्ट बँड भारतासह जगभरात लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे अनेक स्मार्टफोन कंपन्या भारतीय बाजारात ठराविक अंतराने नवनवीन स्मार्टवॉच आणि स्मार्टबँड लाँच करत आहेत. Xiaomi च्या Redmi ब्रँडने गेल्या महिन्यात चीनमध्ये एक ग्लोबल इव्हेंट आयोजित केला होता, ज्यामध्ये Redmi Smart Band Pro आणि Redmi Watch 2 Lite लाँच करण्यात आले होते. हा बँड आज (मंगळवार) भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे. (Redmi Smart Band Pro may launch today in India)

Redmi Smart Band Pro मध्ये 1.47-इंचांची AMOLED स्क्रीन आहे, जी 194×368 पिक्सेलसह येते. त्याची 282 पिक्सेल डेन्सिटी आहे. तसेच यात 450 पीक ब्राइटनेस आहे. कंपनीने यामध्ये 200mAh बॅटरी दिली आहे, जी 14 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह येते. तसेच, हे वॉच सामान्य वापरावर 20 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह येतं. या बँडमध्ये पॉवर सेव्हिंग मोडही देण्यात आला आहे.

Redmi Watch 2 Lite मध्ये काय आहे खास?

हे रेडमी वॉच 2 चे डाउन व्हर्जन आहे आणि त्याचे नाव रेडमी वॉच 2 लाइट असे आहे. यामध्ये यूजर्सना 1.55 इंच TFT डिस्प्ले मिळेल. त्याचे रिझोल्यूशन 320×360 पिक्सेल आहे. यामध्ये 100 पेक्षा जास्त वॉच फेस उपलब्ध आहेत आणि यामध्ये 100 वर्कआउट मोड देण्यात आले आहेत, जे रेडमी वॉच 2 सारखेच आहेत.

यामध्ये इनबिल्ट GPS, SpO2 मॉनिटरिंग फीचर्स, 24-तास हार्ट रेट मॉनिटर ही वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. हे वॉच सिंगल चार्जवर 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतं आणि GPS चा सतत वापर केल्यावर 14 तासांचा बॅकअप उपलब्ध आहे.

Redmi Watch, Redmi band : Pricing and availability

Redmi ने अद्याप त्यांच्या स्मार्टबँड आणि वॉचची किंमत जाहीर केली नाही, तसेच ते कधी उपलब्ध होईल याबद्दलदेखील माहिती देण्यात आलेली नाही. या वॉचची अधिक माहिती लवकरच उपलब्ध होईल. Redmi Smart Band Pro ब्लॅक कलर व्हेरियंटमध्ये येईल, तर Redmi Watch 2 Lite ब्लॅक, ब्लू आणि आयव्हरी केस कलरमध्ये येईल.

इतर बातम्या

Parag Agrawal | पक्के मुंबईकर ते ट्विटरच्या सीईओपदी, कोण आहेत पराग अग्रवाल? कसे पोहोचले सर्वोच्चपदी?

NSO कडून आयफोन युजर्सची हेरगिरी? Apple चा पेगासस निर्मात्यांविरोधात खटला

GoDaddy Hacked : तब्बल 12 लाख वर्डप्रेस यूजर्सचा डेटा चोरी, जाणून घ्या डिटेल्स

(Redmi Smart Band Pro may launch today in India)

पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत.
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका.
सर्जिकल स्ट्राईकच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराचं घुमजाव
सर्जिकल स्ट्राईकच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराचं घुमजाव.
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.