AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samsung चा बजेट रेंजमधला 5G फोन बाजारात, जाणून घ्या नव्या फोनमध्ये काय आहे खास?

Samsung ने नुकताच एक बजेट रेंजमधला 5G फोन लांच केला आहे. या मोबाईलची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. हा फोन ट्रिपर रियर कॅमेरा सेटअपसह सादर करण्यात आला आहे.

Samsung चा बजेट रेंजमधला 5G फोन बाजारात, जाणून घ्या नव्या फोनमध्ये काय आहे खास?
Samsung Galaxy A13 5G
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 4:51 PM

मुंबई : Samsung Galaxy A13 5G मोबाईल फोन नुकताच लॉन्च करण्यात आला आहे, जो किफायतशीर सेगमेंटमधील स्मार्टफोन आहे. या मोबाईलची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या फोनच्या प्रमुख स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये मीडियाटेक डायमेंशन 700 चिपसेट वापरण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, ग्राहकांना यामध्ये 90hz रिफ्रेश रेटसह उत्तम डिस्प्ले मिळेल. (Samsung Galaxy A13 5G sale live, smartphone launched with 50MP cam, 5000mAh Battery)

Samsung Galaxy A13 5G ची किंमत

Samsung Galaxy A13 5G ची किंमत $249.99 (जवळपास 18,700) इतकी आहे आणि हा फोन सध्या यूएसमध्ये लाँच करण्यात आला आहे. आजपासून यूएसमध्ये या फोनची विक्री फक्त सुरू झाली आहे. हा फोन लवकरच भारतात लाँच केला जाणार असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

Samsung Galaxy A13 5G चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A13 5G मध्ये 6.5 इंचाचा Infinity V HD Plus डिस्प्ले आहे, ज्याचं रिझोल्यूशन 90Hz आहे, जो स्क्रोलिंग आणि गेमिंगचा चांगला एक्सपीरियन्स प्रदान करतो. यासोबतच यामध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे, जो बायोमेट्रिक पद्धतीने मोबाईल अनलॉक करण्याचे काम करतो. हा मोबाइल कंपनीच्या OneUI कस्टम स्किनवर काम करतो, जो Android 11 वर आधारित आहे. तसेच यात Knox सिक्युरिटी फीचर्स देण्यात आले आहेत.

Samsung Galaxy A13 5G ची बॅटरी

Samsung Galaxy A13 5G मध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 15W फास्ट चार्जिंगसह येते. तसेच, यामध्ये NFC सपोर्ट आहे, ज्यामुळे कॉन्टॅक्टलेस पेमेंट करण्यात मदत होते. यात ड्युअल बँड वाय-फाय 802 सपोर्ट आहे. यात 3.5Mn ऑडिओ जॅक आहे. हा एक परवडणारा 5G मोबाईल फोन आहे.

Samsung Galaxy A13 5G चा कॅमेरा सेटअप

Samsung Galaxy A13 5G च्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा सेन्सर आहे, ज्यामध्ये f/1.8 अपर्चर आहे. तसेच, यात 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे, जो f/2.4 अपर्चरसह येतो. यात 2 मेगापिक्सल्सचा डेप्थ सेन्सर आहे, जो f/2.4 अपर्चरसह येतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी कंपनीने 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला आहे, जो f/2.0 अपर्चर सह येतो.

चीनी कंपन्यांना टक्कर

सॅमसंगचे अनेक 5G स्मार्टफोन असले तरी भारतासह जागतिक बाजारपेठेत कंपनी आता 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5G फोन सादर करत आहे. अशा परिस्थितीत सॅमसंग रेडमी, रियलमी ओप्पो सारख्या चीनी कंपन्यांशी स्पर्धा करण्याचा विचार करत आहे.

इतर बातम्या

Redmi Note 10S चं नवीन स्टोरेज व्हेरिएंट भारतात लाँच, किंमत…

8GB/128GB, 50MP कॅमेरासह Vivo Y55s बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

Iphone 12 vs Iphone 13 : फक्त किंमत आणि कॅमेराच नव्हे तर आणखी बरेच फरक, जाणून घ्या तुमच्यासाठी परफेक्ट मॉडेल कोणतं?

(Samsung Galaxy A13 5G sale live, smartphone launched with 50MP cam, 5000mAh Battery)

ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम
ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम.
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच.
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'.
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर.
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल.
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द.
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं.
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.