Samsung फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी S22 लाँचिंगसाठी सज्ज, आयफोनपेक्षा लहान, फीचर्स दमदार

सॅमसंगने आतापर्यंत आपली सर्व फ्लॅगशिप उपकरणे लाँच केली आहेत. दरम्यान आता सॅमसंगच्या आगामी फोन बद्दल अनेक लीक्स समोर येत आहेत,

Samsung फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी S22 लाँचिंगसाठी सज्ज, आयफोनपेक्षा लहान, फीचर्स दमदार
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 6:36 PM

मुंबई : तंत्रज्ञानाच्या जगात आपण आता वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत प्रवेश करत आहोत. अशा परिस्थितीत सॅमसंगने आतापर्यंत आपली सर्व फ्लॅगशिप उपकरणे लाँच केली आहेत. पण आता सॅमसंगच्या आगामी फोन बद्दल अनेक लीक्स समोर येत आहेत, हे लीक्स गॅलेक्सी एस 22 सिरीजबद्दलचे आहे. जर लीक्सवर विश्वास ठेवला तर प्रसिद्ध सॅमसंग टिपस्टर आइस युनिव्हर्सने गॅलेक्सी एस 22 बद्दल काही महत्त्वपूर्ण खुलासे केले आहेत. त्यांनी आता गॅलेक्सी एस 22 च्या बॅटरीच्या आकाराबद्दल सांगितले आहे, त्याच वेळी त्यांनी असेही म्हटले आहे की फोन अॅपल आयफोन 13 पेक्षा लहान असेल. (Samsung Galaxy S22 features leaked; smartphone to be smaller than iPhone 13)

ट्विटनुसार, सॅमसंग गॅलेक्सी एस 22 मध्ये 3700 एमएएच बॅटरी दिली जाईल. हा फोन अँड्रॉइड फ्लॅगशिपपेक्षा थोडा लहान असेल. परंतु असे म्हटले जात आहे की, त्याचा आकार त्याच्या बॅटरीसाठी परफेक्ट असेल. जर आपण कॉम्पॅक्ट स्मार्टफोनबद्दल बोललो तर त्याची बॅटरी लहान आहे. दुसरीकडे, जर आपण सॅमसंग गॅलेक्सी एस 22 च्या किंमतीबद्दल बोललो तर हँडसेट आयफोन 13 च्या तुलनेत जास्त पॉकेट फ्रेंडली असेल.

टिपस्टरने असेही म्हटले आहे की गॅलेक्सी S22 लांबीमध्ये देखील लहान असेल. त्याच वेळी, त्याचे मेजरमेंट 146.7 x 71.5 x 7.7 मिमी इतके असेल. गॅलेक्सी एस 22 हा अँड्रॉइड मार्केटमधील सर्वात कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. सॅमसंगने पूर्वी लॉन्च केलेला सर्वात कॉम्पॅक्ट स्मार्टफोन गॅलेक्सी एस 10 ई होता, ज्याची स्क्रीन साईज 5.8 इंच इतकी होती. गॅलेक्सी एस 22 ची स्क्रीन साईज 6.06 इंच इतकी असेल.

टिपस्टरने असेही सांगितले की गॅलेक्सी एस 22 मध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. हा फोन गॅलेक्सी एस 22+ आणि गॅलेक्सी एस 22 अल्ट्राच्या तुलनेत चार्जिंग स्पीडमध्ये थोडा मागे असेल. यावेळी कंपनी सॅमसंगचे GN1 आणि GN2 कॅमेरा सेन्सर गॅलेक्सी S22+ मध्ये देणार नाही. त्याऐवजी, या वेळी फोनमध्ये ISOCELL GN5 कॅमेरा सेन्सर दिला जाईल. सॅमसंग गॅलेक्सी एस 22 सिरीजमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 898 एसओसी देण्यात येईल. अंडर डिस्प्ले कॅमेरा स्मार्टफोनमध्ये दिला जाईल जो पंच होल डिस्प्लेसह येईल.

इतर बातम्या

Apple iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max च्या भारतीय खरेदीदारांना धक्का, शिपिंग उशिरा होणार

स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरसह 27 सप्टेंबरला ढासू स्मार्टफोन लाँच होणार, जाणून घ्या दमदार फीचर्स

र्षअखेर Google Pixel Fold लाँच होणार, LTPO OLED डिस्प्लेसह सुसज्ज डिव्हाईस

(Samsung Galaxy S22 features leaked; smartphone to be smaller than iPhone 13)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.