Samsung Galaxy S23 आणि Galaxy S 22 मध्ये मोठा प्रॉब्लेम! तक्रारीनंतर कंपनीने दिलं असं उत्तर
कंपनीने सॅमसंग गॅलक्सी एस23 सीरिज लाँच केली आहे. या सीरिजअंतर्गत सॅमसंग गॅलक्सी एस 23 अल्ट्रा, सॅमसंग गॅलक्सी एस23 प्लस, सॅमसंग गॅलक्सी एस23 उपलब्ध आहेत. मात्र लाँचच्या काही दिवसात या सीरिजच्या स्मार्टफोनमध्ये समस्या येत असल्याचं युजर्सचं म्हणणं आहे.
मुंबई : दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगच्या स्मार्टफोनचे जगभरात अनेक चाहते आहेत. नुकतची कंपनीने सॅमसंग गॅलक्सी एस23 सीरिज लाँच केली आहे. या सीरिजअंतर्गत सॅमसंग गॅलक्सी एस 23 अल्ट्रा, सॅमसंग गॅलक्सी एस23 प्लस, सॅमसंग गॅलक्सी एस23 उपलब्ध आहेत. मात्र लाँचच्या काही दिवसात या सीरिजच्या स्मार्टफोनमध्ये समस्या येत असल्याचं युजर्सचं म्हणणं आहे. एस23 सीरिजच नाहीत सॅमसंग गॅलक्सी एस22 मध्येही अशीच समस्या येत असल्याचं युजर्सनं सांगितलं आहे. सॅमसंग गॅलक्सी एस23 अल्ट्रा युजर्संनी तर तक्रारींचा पाढा सोशल मीडियावर वाचला आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत डिस्प्लेबाबत कंपनीकडे जाब विचारला आहे. एका युजर्सने आपल्या पोस्टमध्ये स्क्रिनवर बबल दिसत असल्याचं सांगितलं आहे. त्यावर सॅमसंग कंपनीने प्रत्युत्तर देखील दिला आहे.
काय आहे ट्वीटमध्ये
सॅमसंग गॅलक्सी एस23 वापरत असलेल्या ऑरेंज स्कुटर नावाच्या युजर्सने लिहिलं आहे की, “एस23 अल्ट्रा स्मार्टफोनच्या पहिल्या खेपेतील मोबाईलमध्ये समस्या जाणवत आहे.मी त्या दुर्दैवी लोकांमध्ये आहे. दोन्ही वेगवेगळे फोन असून त्या दोन्हीमध्ये सारखीच समस्या आहे. डिस्प्लेमध्ये काहीतरी समस्या असल्याचं जाणवत आहे.” अशी तक्रार करत त्या युजर्सने सॅमसंग कंपनीला टॅग केलं आहे.
#S23Ultra either has some serious quality control issues with the first batch of phones, or Im just the most unlucky person. These are 2 different phones, both with the same issue, with my second one actually being worse. Was the glass not bonded correctly or what?! @SamsungUK pic.twitter.com/7F9ZlmINN3
— MF (@Orange_Scooter) February 14, 2023
सॅमसंग कंपनीने या ट्वीटला प्रत्युत्तर दिलं आहे
सॅमसंग युके युजर्सच्या तक्रारींना प्रत्युत्तर दिलं आहे. कंपनीने आपल्या स्पष्टीकरणात सांगितलं आहे की, विंडो ग्लासच्या खूप साऱ्या लॅमिनेटेड लेयर्स असून त्या डायरेक्टली डिस्प्ले पॅनेलला अॅटॅच आहेत. डिव्हाईस वॉटरप्रुफ आणि डस्टप्रूफ असल्याने त्या दाबल्या आहेत. त्यामुळे स्क्रिनवर बबल दिसत आहेत. हा काही समस्या नाही.
The Galaxy S23 display has several laminated layers of window glass (tempered glass) that is attached directly to the display panel. To ensure the device is a waterproof/dustproof structures the layers are pressed to prevent foreign substances or liquids from entering. ^PB 1/2
— Samsung UK (@SamsungUK) February 21, 2023
सॅमसंग गॅलक्सी एस22 मध्येही समस्या
सॅमसंग गॅलक्सी एस23 प्रमाणे एस22 मध्ये बॅटरीबाबत समस्या जाणवत आहे. सॅमसंग वन युआय 5.1 अपडेट केल्यानंतर बॅटरी लवकर संपत असल्याची तक्रार केली आहे.