लाँचिंगपूर्वीच Samsung Galaxy Tab S8 ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या काय असेल खास?

सॅमसंगच्या आगामी फ्लॅगशिप टॅबलेट मॉडेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस 8 अल्ट्रा, गॅलेक्सी टॅब एस 8+ आणि गॅलेक्सी टॅब एस 8 हे टॅब्लेट असणे अपेक्षित आहे

लाँचिंगपूर्वीच Samsung Galaxy Tab S8 ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या काय असेल खास?
Samsung Galaxy Tab S8 (PS- Gizchina)
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 7:06 PM

मुंबई : सॅमसंगच्या (Samsung) आगामी फ्लॅगशिप टॅबलेट मॉडेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस 8 अल्ट्रा (Samsung Galaxy Tab S8 Ultra), गॅलेक्सी टॅब एस 8+ (Galaxy Tab S8+) आणि गॅलेक्सी टॅब एस 8 (Galaxy Tab S8) हे टॅब्लेट असणे अपेक्षित आहे. या स्मार्टफोनच्या अधिकृत घोषणेपूर्वी, त्याची किंमत आणि स्पेसिफिकेशन लीक झाली आहे. (Samsung Galaxy Tab S8 series Price and features leaked before its launch)

तीन टॅब्लेट्सना अनुक्रमे Basquiat 3, Basquiat 2, आणि Basquiat 1 असे कोडनेम देण्यात आली आहेत. गेल्या वर्षीच्या गॅलेक्सी टॅब एस 7 + आणि गॅलेक्सी टॅब एस 7 मॉडेल्सप्रमाणे आगामी गॅलेक्सी टॅब एस 8 सिरीजमध्ये 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले असल्याचे म्हटले जात आहे. गॅलेक्सी टॅब एस 8 अल्ट्रा आणि गॅलेक्सी टॅब एस 8 + OLED डिस्प्लेसह येऊ शकतात तर गॅलेक्सी टॅब एस 8 LTPS TFT प्रदर्शनासह येऊ शकतात.

ट्विटरवर टिपस्टरद्वारे तीन कथित सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस 8 सिरीज टॅब्लेटचे फीचर्स आणि किंमती शेअर करण्यात आल्या आहेत. तिन्ही मॉडेल्समध्ये समान रियर कॅमेरा सेटअप, स्पीकर्स आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट फीचर असण्याची अपेक्षा आहे. Gizmochina यांच्या ट्विटनुसार वाय-फाय, एलटीई आणि 5 जी पर्यायांसह हे टॅब सादर केले जाऊ शकतात. दरम्यान, सॅमसंगने गॅलेक्सी टॅब एस 8 सिरीजबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस 8 अल्ट्राचे फीचर्स आणि किंमत

लीक्सनुसार, सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस 8 अल्ट्रा मध्ये 14.6 इंचांच्या ओएलईडी डिस्प्लेला 120 हर्ट्झचा रीफ्रेश रेट मिळेल अशी अपेक्षा आहे. हे टॅब दोन स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये सादर केले जाऊ शकतात. 8 जीबी + 128 जीबी आणि 12 जीबी + 512 जीबी असे दोन पर्याय मिळू शकतात. अल्ट्रा व्हेरिएंटमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो ज्यामध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 5 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेन्सर असेल. गॅलेक्सी टॅब एस 8 अल्ट्रामध्ये 12,000mAh बॅटरी असण्याची अपेक्षा आहे जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या टॅबचं वजन 650 ग्रॅम असू शकतं.

किंमतीच्या बाबतीत, वाय-फाय मॉडेलची किंमत 1,469,000 KRW (अंदाजे 95,500 रुपये) असणे अपेक्षित आहे. LTE व्हेरिएंटची किंमत केआरडब्ल्यू 1,569,000 KRW (अंदाजे 1.02 लाख रुपये) असू शकते आणि 5G व्हेरिएंटची किंमत 1,669,000 KRW (अंदाजे 1.08 लाख रुपये) इतकी असू शकते.

इतर बातम्या

वीजेशिवाय चालणारे AC बाजारात, दर महिन्याला 4200 रुपयांच्या वीजबिलाची बचत करणार

Flipkart Electronic sale : सॅमसंग, रियलमी आणि पोकोच्या ‘या’ स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काऊंट

48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, Realme चा नवा स्मार्टफोन लाँच, किंमत…

(Samsung Galaxy Tab S8 series Price and features leaked before its launch)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.