Instagram : इंस्टाग्राम ‘ॲडीक्ट’ आहात?… आता स्वत:च सेट करा दिवसभराची टाइम लिमिट…

एकदा इंस्टाग्राम उघडले की त्यात, अर्धा ते एक तास सहज कुठे निघून जातो ते समजत नाही. असं जवळपास सर्वांसोबतच होतं. परंतु आता इंस्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी एक नवीन ॲप्लिकेशन आणले आहे. त्याव्दारे तुम्ही इंस्टावरील तुमची दिवसभराची टाइम लिमिट सेट करु शकणार आहात.

Instagram : इंस्टाग्राम ‘ॲडीक्ट’ आहात?... आता स्वत:च सेट करा दिवसभराची टाइम लिमिट...
इंस्टाग्रामImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 1:45 PM

इंस्टाग्राम (Instagram) हे जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणार्या समाज माध्यमांमधील एक प्रसिध्द सोशल नेटवर्किंग नेटवर्क आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इंस्टाने महिन्यातील 2 बिलियन ॲक्टीव्ह युजर्सचा (Active Users) टप्पा पार केला आहे. या ॲपमध्ये व्हिडिओ शेअरिंग फिचर्स रिल्स आल्यामुळे याच्या प्रसिध्दीत अधिकच वाढ झालेली आहे. अनेक युजर्स एक वेळा हे ॲप ओपन केल्यावर तासंतास ते व्हिडिओचे रिल्स बघत बसतात. अनेकांना हा कंटेंट स्ट्रीम करण्याची सवयदेखील होत असते. ॲपच्या वापरकर्त्यांना या प्लॅटफार्मवर घालवण्यात येत असलेल्या वेळेला रेस्ट्रिक्ट करण्यासाठी म्हणजेच दिवसभराची टाइम लिमिट (Set time limit) ठरविण्यासाठीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये वापरकर्ते त्यांनी ठरवलेल्या टाइम लिमिटमध्येच या ॲपचा वापर करुन शकणार आहेत.

मेटाच्या मालकीच्या असलेल्या इंस्टाग्रामने 2018 मध्ये आपल्या या प्लॅटफार्मवर एक नवीन फिचर आणले होते. ज्या माध्यमातून वापरकर्त्यांना या ॲप्लिकेशनच्या वापरासाठी डेली टाइम लिमिट सेट करण्याची सुविधा देण्यात आली होती. या फिचरला फर्मच्या रोजच्या वेलबीइंग टूल्सच्या आधारावर ॲड करण्यात आले होते. या सुविधेनुसार वापरकर्त्यांसाठी एकूण 6 पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्यात, 15 मिनिट, 30 मिनिट, 45 मिनिट, एक तास, दोन तास आणि ऑफ, यांचा समावेश होता. यात ॲपच्या माध्यमातून वापरकर्ते ‘टेक अ ब्रेक’ या फिचरचा वापर करुन ब्रेक घेण्यासाठी रिमाइंडरदेखील सेट करु शकत आहेत.

असे सेट करा डेली टाइम लिमिट

1) आपल्या प्रोफाईलला अॅक्सेस करण्यासाठी स्क्रीनच्या खाली उजव्या बाजूच्या कोपर्याला आपल्या प्रोफाईलला टॅप करा. 2) ड्रॉप-डाउन मेन्यूपासून हॅमबर्गर मेन्यूला सिलेक्ट करा. 3)your activity या पर्यायावर टॅप केल्यानंतर ड्रॉप-डाउन मेन्यूमधून टाइम सिलेक्ट करावा. 4) त्यानंतर आपल्या गरजेनुसार डेली टाइम लिमिट सेट करावी. 5) त्यानंतर Done वर टॅप करुन प्रक्रिया पूर्ण करावी.

असा सेट करा ब्रेक टाइम

1) ॲपवरील आपल्या प्रोफाईल फोटोला टॅप करावे. 2) हॅमबर्गर मेन्यूला सिलेक्ट करावे. 3) त्यानंतर your activity आणि नंतर टाइमवर जावे. 4) नंतरच्या स्क्रीनवर ब्रेकचा पर्याय घेण्यासाठी सेट रिमाइंडरवर टॅप करावे. 5) त्यानंतर आपल्या ब्रेकच्या गरजेनुसारच्या वेळेला सिलेक्ट करावे व Done पर्यायावर टॅप करावे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.