Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Signal अ‍ॅप वापरणाऱ्या भारतीयांसाठी खुशखबर! कंपनी लवकरच जबरदस्त फिचर्स लाँच करणार

व्हाट्सअ‍ॅपच्या नव्या गोपनीयता धोरणामुळे यूझर्सनी सिग्नल मेसेजिंग अ‍ॅप मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करण्यास सुरुवात केली आहे

Signal अ‍ॅप वापरणाऱ्या भारतीयांसाठी खुशखबर! कंपनी लवकरच जबरदस्त फिचर्स लाँच करणार
Follow us
| Updated on: Jan 13, 2021 | 8:18 AM

मुंबई : प्रायव्हसी पॉलिसी बदलल्यानंतर इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअ‍ॅपला चांगलाच फटका बसला आहे. प्रायव्हसीच्या नव्या फंद्यामुळे यूझर्सनी सिग्नल मेसेजिंग अ‍ॅप मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करण्यास सुरुवात केली आहे. या क्रॉस-प्लॅटफॉर्म एन्क्रिप्टेड मेसेजिंग सर्व्हिस सिग्नल अ‍ॅपने भारतासह जगातल्या अनेक देशांमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. डाऊनलोडिंगच्या बाबतीत सिग्नल अ‍ॅप (Signal App) टॉपवर आहेत. त्यातच आता जास्तीत जास्त भारतीय युजर्सना आकर्षित करण्यासाठी सिग्नल अ‍ॅप लवकरच अनेक फिचर्स सादर करणार आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत ट्विटर पेजवरुन याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे लवकरच Signal अ‍ॅप वापरणाऱ्या भारतीय युजर्सना नवीन फिचर्स मिळणार आहेत. (Signal to roll out chat wallpapers, animated stickers and other features for its Indian Users)

भारतीय युजर्सना चॅट वॉलपेपर आणि अ‍ॅनिमेटेड स्टीकर्सचं फिचर मिळणार आहे. सोबतच युजर्सना त्यांच्या प्रोफाईलसाठी अबाऊट फिल्डही मिळणार आहे. तसेच iOS युजर्सना लवकरच मीडिया ऑटो डाउनलोड आणि फुल स्क्रीन प्रोफाइल फोटो हे पर्याय मिळणार आहेत. हे फिचर अँड्रॉयड युजर्ससाठी आधीच रोलआऊट केलेलं आहे.

कंपनीने ग्रुप कॉल लिमिट 5 वरुन 8 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

गेल्या आठवड्यात सिग्लने त्यांच्या युजर्सना इतर मेसेजिंग अॅप्सवरुन त्यांचं ग्रुप चॅट सिग्नल अॅपवर कसं ट्रान्सफर करायचं त्याबाबत माहिती दिली होती.

नवे युजर्स मिळवण्यात सिग्नल अव्वलस्थानी

क्रॉस-प्लॅटफॉर्म एन्क्रिप्टेड मेसेजिंग सर्व्हिस सिग्नल अॅपने भारतासह जगातल्या अनेक देशांमध्ये डाऊनलोडिंगच्या बाबतीत पहिला क्रमांक मिळवला आहे. शनिवारी सिग्नलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. यावेळी त्यांनी एक स्क्रीनशॉट शेअर करत भारतात व्हॉट्सअ‍ॅपला मागे सारत सिग्लनने पहिलं स्थान मिळावल्याचं यामध्ये सांगण्यात आलं आहे. फक्त भारतातच नाही तर जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, फिनलँड, हाँगकाँग, स्वित्झर्लंडमध्येही सर्वाधिक डाउनलोड केलेल्या अ‍ॅप्समध्ये हा अव्वल स्थानावर आहे.

दोन दिवसात एक लाखांहून अधिक नवे युजर्स

रॉयटर्सने त्यांच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, सेन्सर टॉवर डेटाचा हवाला देत गेल्या दोन दिवसांमध्ये सिग्नल अॅप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर 100,000 पेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केला आहे. इतकंच नाही तर, 2021 च्या पहिल्या आठवड्यात व्हॉट्सअॅपच्या नवीन यूजर्समध्ये 11 टक्क्यांनी घट झाली असल्याचंही समोर आलं आहे.

एलॉन मस्कच्या ट्विटनंतर सिग्नल अॅपची लोकप्रियता वाढली

टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी व्हॉट्सअॅपच्या नव्या घोषणेनंतर सांगितलं की, सिग्नल अॅप हा सुरक्षित असल्यानं त्याचा चांगल्या प्रकारे वापर केला जाऊ शकतो. ते स्वतःदेखील हेच अॅप वापरत असल्याचा दावा काही माध्यमांनी केला होता. मस्क यांच्या ट्वीटमुळे ते स्वतः हे अॅप वापरत असल्याच्या बातमीमुळे सिग्नल अॅपची लोकप्रियता वाढली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत सिग्नल अॅप मोठ्या प्रमाणात डाऊनलोड केलं जात आहे.

संबंधित बातम्या

तुमचा डेटा फेसबुकसोबत शेअर केला जात नाही, नव्या Privacy policy बाबत Whatsapp चं स्पष्टीकरण

व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस ग्रुप लिंक Goggle Search वर लीक, WhatsApp कडून भूमिका जाहीर

सावधान! गुगलच्या एका क्लिकवर तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये कोणीही होऊ शकतं सहभागी

(Signal to roll out chat wallpapers, animated stickers and other features for its Indian Users)

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.