Xiaomi च्या स्लिम, लाइटवेट 5G फोनवर 1500 रुपयांचा डिस्काऊंट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

Xiaomi ने अलीकडेच भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे, ज्याचे नाव Xiaomi 11 Lite NE 5G स्मार्टफोन आहे. अॅमेझॉनवर लिस्टेड असलेल्या पोस्टरनुसार, हा एक स्लिम आणि हलका स्मार्टफोन आहे.

Xiaomi च्या स्लिम, लाइटवेट 5G फोनवर 1500 रुपयांचा डिस्काऊंट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
Xiaomi 11 Lite NE 5G
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 6:09 PM

मुंबई : Xiaomi ने अलीकडेच भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे, ज्याचे नाव Xiaomi 11 Lite NE 5G स्मार्टफोन आहे. अॅमेझॉनवर लिस्टेड असलेल्या पोस्टरनुसार, हा एक स्लिम आणि हलका स्मार्टफोन आहे. तसेच, त्याची सुरुवातीची किंमत 22,499 रुपये आहे, ज्यात एक्सचेंज ऑफर आणि 1500 रुपयांचे कूपन समाविष्ट आहे.(slim and lightweight 5G phone of Xiaomi is getting cheaper, know offer details)

जरी तुम्ही तुमचा स्मार्टफोन एक्सचेंज केला नाही, तरीदेखील तुम्हाला 1500 रुपयांची सूट मिळण्याची खात्री आहे, ज्याचा पर्याय किंमतीच्या खाली दिला आहे आणि त्याच्या बॉक्सवर तपासावा लागेल. हा कंपनीचा पहिला नॉन-एमआय ब्रँडिंग फोन आहे.

Xiaomi 11 Lite NE 5G चे फीचर्स

Xiaomi 11 Lite NE 5G स्मार्टफोनमध्ये 6.55 इंचांचा FHD + OLED डॉट डिस्प्ले आहे. ज्याचा आस्पेक्ट रेशो 20: 9 आहे. गेमिंग आणि चांगल्या स्क्रोलिंग एक्सपीरियन्ससाठी, कंपनीने 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट डिस्प्ले दिला आहे आणि स्क्रीन सेफ्टीसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चं प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. यात पंच होल कटआउट आहे, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा सेट करण्यात आला आहे.

हा फोन ऑक्टा-कोर 5G आधारित क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा फोन लिक्विड कूल तंत्रज्ञानासह येतो. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा, प्रायमरी सेन्सर 64 मेगापिक्सलचा आहे. दुसरा 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे आणि तिसरा 5 मेगापिक्सलचा सुपर मॅक्रो कॅमेरा आहे. 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा फोनमध्ये आहे. हे डिव्हाइस 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येते आणि हा फोन MIUI 12.5 वर आधारित Android 11 वर काम करतो.

या फोनमध्ये 4250 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये डुअल सिम, 5 जी सपोर्ट, वायफाय 6, ब्लूटूथ 5.2, जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे.

इतर बातम्या

बहुप्रतिक्षित OnePlus 9RT ग्राहकांच्या भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

Amazon Great Indian Festival : Redmi चा शानदार स्मार्टफोन अवघ्या 7,020 रुपयात, जाणून घ्या ऑफर

‘या’ स्मार्टफोनमध्ये जबरदस्त कॅमेरा मिळणार, 2021 मध्ये हे टॉप कॅमेरा फोन घरी आणा

(slim and lightweight 5G phone of Xiaomi is getting cheaper, know offer details)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.