तुमच्या फोनचे इंटरनेट स्लो झाले? ‘या’ ट्रिक्स वापरा
तुमच्या फोनचे इंटरनेट खूप स्लो चालत असेल तर चिंता करू नका. कारण, आम्ही तुम्हाला यावर ट्रिक्स सांगणार आहोत. ही ट्रिक्स वापरल्यास तुमच्या मोबाईलचं इंटरनेट फास्ट होईल. यासाठी तुमच्या फोनमध्ये आम्ही खाली दिल्याप्रमाणे ट्रिक्स वापरा. जाणून घ्या.
तुमच्या फोनचे इंटरनेट खूप स्लो चालत आहे का? असं असेल तर चिंता करू नका. ही खूप मोठी गोष्ट नाही. यावर आम्ही सांगत असलेला पर्याय वापरा. आम्ही तुम्हाला यावर ट्रिक्स सांगणार आहोत. ही ट्रिक्स वापरल्यास तुमच्या मोबाईलचं इंटरनेट फास्ट म्हणजेच वेगवान होईल. यासाठी तुमच्या फोनमध्ये आम्ही खाली दिल्याप्रमाणे ट्रिक्स वापरा. जाणून घ्या. वेगवान इंटरनेट स्पीड मिळवण्यासाठी बहुतेक लोक 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करणारे फोन खरेदी करण्यास प्राधान्य देतात. इंटरनेटचा वापर वैयक्तिक ते व्यावसायिक कामांसाठी केला जातो. व्हॉट्सअॅप चालवणं असो, इंटरनेट ब्राउझ करणं असो किंवा ऑनलाइन पेमेंट करणं असो, प्रत्येकाला इंटरनेटची गरज असते.
काही वेळा फोनमध्ये इंटरनेटचा स्पीड स्लो होतो. जर तुमच्या फोनचं इंटरनेट खूप हळू चालत असेल. पेज लोड होण्याची वाट बघत असताना तुम्हीही अस्वस्थ असाल तर काळजी करू नका. तुमच्या फोनचा इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही ट्रिक्स घेऊन आलो आहोत.
‘या’ सेटिंग्ज बदलून इंटरनेट स्पीड वाढवा
- फोन रिस्टार्ट करा: अनेकदा फोन रिस्टार्ट केल्यानेच इंटरनेटचा स्पीड वाढतो.
- अॅप्स अपडेट करा: जुने अॅप्स इंटरनेट स्पीड स्लो करू शकतात. त्यामुळे सर्व अॅप्स अपडेट करा.
- कॅश आणि कुकीज क्लिअर करा: कॅश आणि कुकीज फोनच्या मेमरीमध्ये स्टोअर होतात आणि इंटरनेटचा वेग कमी करू शकतात. ते नियमितपणे क्लिअर करत रहा.
- बॅकग्राऊंड अॅप्स बंद करा: बॅकग्राऊंडमध्ये चालणारे अॅप्स इंटरनेट डेटा वापरतात आणि स्पीड स्लो करू शकतात. त्यामुळे सध्या वापरत नसलेले अॅप्स बंद करा.
- रिसेट नेटवर्क सेटिंग्स: कधीकधी नेटवर्क सेटिंग्जमध्ये काही समस्या उद्भवू शकतात ज्यामुळे इंटरनेट स्लो होते. नेटवर्क सेटिंग्ज रीसेट केल्याने ही समस्या सुधारू शकते.
- मोबाईल डेटा ऑटोमध्ये सेट करा: काही ठिकाणी 4G नेटवर्क उपलब्ध नाही. त्यामुळे चांगला वेग येत नाही. त्याचबरोबर 2G/3G नेटवर्क अधिक चांगला स्पीड देऊ शकते. सेटिंग्जमधील “मोबाईल डेटा” सेक्शनमध्ये जा आणि 2G/ 3G/4G ऑटोवर स्विच करा.
- एअरप्लेन मोड ऑन आणि ऑफ करा: नेटवर्क रीसेट करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. फक्त काही सेकंद एअरप्लेन मोड चालू करा आणि नंतर ते बंद करा.
- इंटरनेट प्लॅन तपासा: तुमच्याकडे इंटरनेट डेटा लिमिट संपली असेल.
- फोन स्कॅन करा: तुमच्या फोनमध्ये व्हायरस किंवा मालवेअर असू शकतो ज्यामुळे इंटरनेट स्लो होत आहे. चांगल्या अँटीव्हायरसने आपला फोन स्कॅन करा.