तब्बल 200 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन… जबरदस्त फीचर्समुळे ग्राहक झाले अवाक…

200 मेगापिक्सलशिवाय या अपकमिंग स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेंसर मिळणार आहे. सोबतच यात तिसरा लेंस 12 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेंस असेल. तर दुसरीकडे 60 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

तब्बल 200 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन... जबरदस्त फीचर्समुळे ग्राहक झाले अवाक...
मोबाईलImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 11:26 AM

200 मेगापिक्सलसह (200 megapixel camera) लेनोवो लवकरच आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. सोबतच या स्मार्टफोनबाबत कंपनीकडून मोठा खुलासाही करण्यात आला आहे. मोटोरोलाच्या या अपकमिंग स्मार्टफोनचा (Smartphone) फोटो समोर आला असून यात फोनला लाईव्ह पाहिले जाउ शकते. सोबत या नवीन स्मार्टफोनच्या कलर व्हेरिएंटचीही माहिती मिळत आहे. मोटोरोलाचा मालकी हक्क असलेली कंपनी लेनोवोच्या एका अधिकार्यांनी या अपकमिंग मोबाईल फोनचे काही फोटो शेअर केले आहेत. लेनोवो एक्झीकेटीव्हतर्फे शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये तीन लेंस दिसून येत आहेत. यात एक मोठी लेंस असून अन्य दोन्ही सेकंड आणि थर्ड लेंस खूप लहान आहेत. कॅमेरा मॉड्यूलसाठी बंपचा वापर करण्यात आलेला असून त्यावर मेगापिक्सल एचपी 1 ओआईएस सेंसर लिहिले आहे. त्यामुळे हा फोटो 200 मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनचा आहे, हे स्पष्ट होत आहे. यात एक एलईडी फ्लॅश लाइट्‌सचाही (LED flash lights) वापर करण्यात आलेला आहे.

फोनमध्ये मिळणार दमदार स्पीड

अपकमिंग स्मार्टफोनचे फोटो शेअर करणारी व्यक्ती हे चेन जिन असून ते लेनोवोचे जनरल मेनेजर आहेत. या फोटोला चिनी माइक्रोब्लागिंग साइट वीबोवर पोस्ट करण्यात आले आहे. शेअर करण्यात आलेल्या पिक्चरला डाउनलोड करण्याचाही पर्याय देण्यात आलेला असून त्यामुळे क्लिअरिटी आणि पिक्सल स्पष्टपणे दिसून येत आहे. मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये केवळ दमदार कॅमेरा सेटअपच नाही तर स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 चिपसेटचाही वापर करण्यात आला असून हे एक फ्लॅगशिप ग्रेडचे प्रोसेसर आहे.

काय आहे कमेरा स्पेसिफिकेशन्स

200 मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या या स्मार्टफोनमध्ये अनेक चांगले फीचर्स देण्यात आलेले आहेत. यात 6.73  इंचाचा फूल एचडी प्लस एमोलेड डिसप्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट्‌स 144 हर्ट्‌स आहे. सोबत यात एचडीआर 10 प्लसचा सपोर्टसुध्दा मिळणार आहे. यात 4500 एमएएचची बॅटरी देण्यात आली असून ती 125 व्हॅटच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

60 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा

200 मेगापिक्सलशिवाय या अपकमिंग स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेंसर मिळणार आहे. सोबतच यात तिसरा लेंस 12 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेंस असेल. तर दुसरीकडे 60 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. दरम्यान, अद्याप या फोनच्या लाँचिंग डेटची घोषणा करण्यात आली नसली तरी लवकर हा फोन बाजारात दिसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.