Snapchat controversial feature : वादानंतर स्नॅपचॅटनं हटवलं नव्यानं दाखलं झालेलं ‘हे’ फीचर….

कंपनी लेन्सच्या स्वरूपात स्नॅपचॅट फिल्टर्स ऑफर करते. हे यूझर्सना ओपन-सोर्स सॉफ्टवेअर लुकरी वापरून रिअल टाइममध्ये त्यांचा लूक सुधारण्याची परवानगी देते. ही लेन्स यूझर्सने व्युत्पन्न केली आहे.

Snapchat controversial feature : वादानंतर स्नॅपचॅटनं हटवलं नव्यानं दाखलं झालेलं 'हे' फीचर....
स्नॅपचॅटचं माओरी टॅटू फिल्टरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 4:56 PM

आपल्या वादग्रस्त भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले स्नॅपचॅट (Snapchat) पुन्हा एकदा वादात सापडले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या स्नॅपचॅटने वाद उफाळून आल्यानंतर माओरी टॅटू फिल्टर (Maori tattoo filter) काढून टाकला आहे. स्नॅपचॅटच्या या फिल्टरमुळे न्यूझीलंडच्या स्थानिक समुदायामध्ये नाराजी पसरली होती, त्यानंतर स्नॅपचॅटने हे फिल्टर आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आहे. माओरी लोक त्यांची टॅटू कला पवित्र मानतात आणि ते परिधान करणार्‍यांच्या ओळखीचे एक महत्त्वाचे चिन्ह म्हणून घेतले जाते. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानंतर निर्माण झालेल्या वादामुळे स्नॅपचॅटने हे पाऊल उचलले. रेडिओ न्यूझीलंडने (Radio New zealand) माओरी फेस टॅटू आणि माओरी यासारख्या नावांसह इन्स्टाग्रामवर फिल्टर लागू करणाऱ्या यूझर्सचे फोटो दाखवले. यानंतर स्नॅपचॅटने हे फिल्टर त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आल्याचे जाहीर केले आहे.

लेन्सच्या स्वरूपात स्नॅपचॅट फिल्टर्स ऑफर

कंपनी लेन्सच्या स्वरूपात स्नॅपचॅट फिल्टर्स ऑफर करते. हे यूझर्सना ओपन-सोर्स सॉफ्टवेअर लुकरी वापरून रिअल टाइममध्ये त्यांचा लूक सुधारण्याची परवानगी देते. ही लेन्स यूझर्सने व्युत्पन्न केली आहे आणि ती इतर प्लॅटफॉर्मवर मुक्तपणे शेअर आणि वापरली जाऊ शकते.

माओरींसाठी आहे अभिमानाची बाब

स्नॅपने बीबीसीला दिलेल्या निवेदनात सांगितले, की आम्ही आमच्या समुदायाला मार्गदर्शक तत्त्वांनुसार लेन्स तयार करण्यास प्रोत्साहित करतो. हे काम संपूर्ण नियमांनुसार केले जाते. न्यूझीलंडच्या स्थानिक माओरी समुदायाचे चेहऱ्यावरील टॅटू किंवा मोको हे शतकानुशतके माओरी संस्कृतीचा भाग असल्याचे मानले जाते. ते एका महत्त्वाच्या विधीमध्ये छिन्नी वापरून त्वचेवर कोरले जातात. ही एक अभिमानाची बाब माओरी समुदायामध्ये गणली जाते. मात्र अशाप्रकारे फोटो फिल्टरमध्ये ती वापरल्याने काही वाद निर्माण झाला. शेवटी कंपनीला हे फीचर मागे घ्यावे लागले.

हे सुद्धा वाचा

भारतीयांवर केले होते वादग्रस्त वक्तव्य

स्नॅपचॅटचे सीईओ इव्हान स्पीगल यांनी 2015मध्ये म्हटले होते, की हे अॅप फक्त श्रीमंत लोकांसाठी आहे. मला भारत आणि स्पेनसारख्या गरीब देशांमध्ये याचा विस्तार करायचा नाही. या वक्तव्यानंतर मोठा वाद झाला होता. त्यानंतर अनेक भारतीयांनी स्नॅपचॅट अनइन्स्टॉल केले होते.

Non Stop LIVE Update
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.