दक्षिण कोरिया : जगातील पहिला 5G सेवा सुरु करणार देश

सियोल : सर्वात अगोदर कोणता देश 5G सेवा सुरु करणार या स्पर्धेत दक्षिण कोरियाने बाजी मारली आहे. दक्षिण कोरिया हा जगात पहिला 5G सेवा सुरु करणारा देश बनला आहे. दक्षिण कोरियाच्या दुरसंचार कंपन्यांच्या मते, त्यांनी निश्चित वेळेच्या दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रीय स्तरावर 5G सेवा सुरु केल्या. दक्षिण कोरियाच्या तीन सर्वोच्च कंपन्या एसके टेलीकॉम, केटी आणि एलजी […]

दक्षिण कोरिया : जगातील पहिला 5G सेवा सुरु करणार देश
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

सियोल : सर्वात अगोदर कोणता देश 5G सेवा सुरु करणार या स्पर्धेत दक्षिण कोरियाने बाजी मारली आहे. दक्षिण कोरिया हा जगात पहिला 5G सेवा सुरु करणारा देश बनला आहे. दक्षिण कोरियाच्या दुरसंचार कंपन्यांच्या मते, त्यांनी निश्चित वेळेच्या दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रीय स्तरावर 5G सेवा सुरु केल्या. दक्षिण कोरियाच्या तीन सर्वोच्च कंपन्या एसके टेलीकॉम, केटी आणि एलजी यूप्लसने बुधवारी स्थानिक वेळेनुसार रात्री 11 वाजता ही 5G सेवा सुरु केली. ही सेवा सुरु करण्यासाठी 5 एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली होती.

सर्वात पहिले 5G सेवा सुरु करण्याच्या स्पर्धेत दक्षिण कोरियासोबत अमेरिका, चीन आणि जपानही होते. दक्षिण कोरियाने वेळेपूर्वी 5G सेवा सुरु केल्याने अमेरिकेच्या दुरसंचार कंपनी व्हेरिजॉनलाही त्यांची 5G सेवा लवकर सुरु करावी लागली. व्हेरिजॉनने बुधवारीच शिकागो आणि मिनीपोलीस येथे 5G सेवा सुरु केली. अमेरिकेने निश्चित वेळेच्या एका आठवड्यापूर्वीच ही सेवा सुरु केल्याचं सांगितलं.

दक्षिण कोरियाने अमेरिकेच्या दोन तासापूर्वी 5G सेवा सुरु केली. दक्षिण कोरियाची सर्वात मोठी दुरसंचार कंपनी एसके टेलिकॉमने गुरुवारी याबाबतची घोषणा केली. केटी आणि एलजी यूप्लसनेही तेव्हाच ही सेवा सुरु केल्याचं सांगितलं. तर 5 एप्रिलपासून सामान्य ग्राहकांसाठी ही सेवा सुरु करण्यात आली.

जानकारांच्या मते, 5G सेवा स्मार्टफोनला वेगवान कनेक्टिव्हिटी उपलब्ध करवून देईल. याची स्पीड 4G च्या तुलनेत 20 पटीने अधिक असेल. यामुळे एका सेकंदापेक्षाही कमी वेळात संपूर्ण सिनेमा डाउनलोड होईल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.