Spy Camera : ‘या’ चार्जरमध्ये लपलाय मोशन सेन्सर असलेला कॅमेरा, हालचाल होताच करू लागतो रेकॉर्ड; किंमतही खूप कमी!
तुम्ही अनेक तऱ्हेचे छुपे कॅमेरे बघितले असतील किंवा त्याबद्दल ऐकलं असेल. कधी पेनमध्ये तर कधी पर्स किंवा शर्टाच्या बटनमध्येही स्पाय कॅमेरे लपवलेले असतात. मात्र सध्या एका नव्या छुप्या कॅमेऱ्याबद्दल माहिती समोर आली आहे, तो कॅमेरा एका चार्जरमध्ये लपवलेला आहे.
बाजारात तुम्ही अनेक तऱ्हेचे चार्जर्स बघितले असतील. 10W पासून ते 160W पर्यंतचे चार्जर बाजारात मिळतात. मात्र तुम्ही कधी स्पाय कॅमेरा अथवा छुपा कॅमेरा लावलेला चार्जर (Spy Camera in Charger) पाहिला आहेत का ? बाजारात अशा अनेक वस्तू मिळतात, ज्यामध्ये छुपे कॅमेरे (spy Cameras) असतात. पेन, पर्स किंवा शर्टाच्या बटनात छुपे कॅमेरे असतात, तुम्ही असे कॅमेरे चित्रपटातही पाहिले असतील. मात्र मोबाईल फोनच्या चार्जरमध्ये छुपा कॅमेरा बसवण्यात आल्याचे कॉम्बिनेशन एकदम आगळे-वेगळे आहे. चार्जरवर कोणाची सहजासहजी नजर पडत नाही, त्यामुळे त्यामध्ये कोणी कॅमेरा लपवला असेल याचा संशयही येत नाही. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर असे अनेक पर्याय तुम्हाला मिळतील. ॲमेझॉनच्या (Amazon) वेबसाईटवर असाच एका छुप्या कॅमेऱ्याचा पर्याय सापडला आहे. या साईटवरून तुम्ही चांगल्या किमतींमध्ये स्पाय कॅमेरा असणारा चार्जर खरेदी करू शकता. इथे अनेक पर्याय असले तरी, IFITech चा चार्जर हा बेस्ट सेलर श्रेणीतील आहे.
काय आहे या स्पाय कॅमेरा चार्जरची खासियत ?
तसं बघायला गेलं तर हा चार्जिंग ॲडॉप्टर इतर चार्जर्ससारखाचा आहे. त्याच्या USB केबल पोर्टजवळ एक लहान छिद्र असून त्यामध्येच कंपनीद्वारे एक कॅमेरा बसवण्यात आला आहे. त्यासाठी तुम्हाला कोणतेही सेटिंग करण्याची गरज नाही. ग्राहकांना IFITech च्या या चार्जरमध्ये केवळ मायक्रो एसडी कार्ड वापरावे लागेल आणि तो डिव्हाईस पॉवर सॉकेटमध्ये प्लग-इन करावा लागेल. त्यानंतर तुमचे काम सुरू होईल. एसडी (SD Card) कार्डमध्ये रेकॉर्ड होणारा व्हिडीओ युजर्स OTGद्वारे मोबाईलला किंवा USB कनेक्टद्वारे कॉम्प्युटरला जोडून तो व्हिडीओ पाहू शकतात.
यामध्ये तुम्हाला 70 डिग्री व्ह्यूईंग ॲंगलसह 1080P HD कॅमेरा मिळतो. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे, हा कॅमेरा स्मार्ट मोशन डिटेक्शन फीचरसह ( Smart motion detection feature) येतो. एखादी हालचाल सुरू झाल्याचे आढळले की लगेच या स्पाय कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग सुरू होते.
स्पाय कॅमेऱ्याची किंमत किती ?
चार्जरमध्ये लपलेला हा स्पाय कॅमेरा तुम्ही ॲमेझॉन (Amazon) वरून खरेदी करू शकता. याची किंमत आहे 1500 रुपये. या बजेटमध्येच तुम्हाला (स्पाय कॅमेऱ्याचे) इतर अनेक पर्यायही मिळू शकतील, मात्र IFITechच्या चार्जरला मिळालेले रेटिंग खूप चांगले आहे. याचा वापर तुम्ही घरात किंवा ऑफीसमध्ये लक्ष ठेवण्यासाठी करू शकता.