iQOO Z9x 5G Launch: 16GB रॅम, 50MP कॅमेरा; किंमत ऐकून नाही विश्वास बसणार

Smartphone under 15000 : बाजारात iQoo Z9x 5G ने धुरळा उडवून टाकला. बाजारात या स्मार्टफोनची जोरदार चर्चा रंगली आहे. या स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची दमदार बॅटरी, स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आले आहे. या मोबाईलची किंमती ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

iQOO Z9x 5G Launch: 16GB रॅम, 50MP कॅमेरा; किंमत ऐकून नाही विश्वास बसणार
नवीन दमदार स्मार्टफोन बाजारात
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 5:32 PM

बाजारात iQoo Z9x 5G या स्मार्टफोनने धुराळा उडवून टाकला आहे. ग्राहकांसाठी कंपनीने आणलेल्या दमदार स्मार्टफोनची एकच चर्चा सुरु आहे. या ताज्या दमाच्या किफायतशीर 5जी स्मार्टफोनमध्ये अनेक खास गोष्टी आहेत. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, 50 मेगापिक्सल कॅमेरा सेटअप आणि 6000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. सध्या बाजारात अनेक मोबाईल दाखल होत आहे. किफायतशीर आणि अनेक फीचर्ससाठी या दमदार फोनचा विचार करु शकता.

बाजूला सेंसर बटण

या iQOO Mobile मध्ये सुरक्षेसाठी या फोनच्या बाजूला एक पॉवर बटण आहे. त्यात सेंसर देण्यात आले आहे. याशिवाय या फोनमध्ये युझर्सला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1 टीबीपर्यंत स्टोरेज वाढविता येईल. धुळ आणि पाण्याच्या थेंबापासून वाचण्यासाठी IP64 रेटिंग देण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

iQoo Z9x 5G Price in India

ताज्या दमाच्या आयक्यू मोबाईल तीन व्हेरिएंटमध्ये देण्यात आला आहे. 4 जीबी रॅमसह 128 जीबीचा व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये, 6 जीबी रॅम/128 जीबी व्हेरिएंटची किंमत 14,499 रुपये आहे. या फोनच्या टॉप व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. हे मॉडल खरेदी करण्यासाठी 15,999 रुपये खर्च करावे लागतील.

ॲमेझॉनची ऑफर

हा स्मार्टफोन ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. या फोनची विक्री 21 मे रोजी दुपारी 12 वाजता कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन आणि ॲमेझॉनवरुन सुरु होईल. हा फोन खरेदी करताना तुमच्याकडे SBI वा ICICI बँक कार्ड असेल तर बिल पेमेंटवर 1 हजार रुपयांची तात्काळ सूट मिळेल.

iQoo Z9x 5G Specifications

  1. डिस्प्ले : 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्टच्या या फोनमध्ये 6.72 इंचाची फुल-एचडी प्लस डिस्प्ले मिळेल.
  2. सॉफ्टवेयर : आयक्यू फोनमध्ये अँड्राईड14 वर आधारीत फनटच ओएस 14 चा सपोर्ट मिळतो.
  3. प्रोसेसर : स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 6 जेनरेशन 1 ऑक्टा-कोर प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे.
  4. कॅमेरा सेटअप : रिअरमध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, सोबत 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. समोरच्या बाजूस 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहे.
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.