Tata Play Fiber कडून एक महिना मोफत 1000GB हाय-स्पीड इंटरनेट, जाणून घ्या ऑफर क्लेम करण्याची पद्धत

अलीकडेच टाटा स्काय ब्रॉडबँडचे (Tata Sky Broadband) नाव बदलून टाटा प्ले फायबर (Tata Play Fiber) करण्यात आले आहे. नाव बदलल्यानंतर आता कंपनी आपल्या नवीन ग्राहकांना एका महिन्यासाठी 1,150 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन (Broadband Plan) देत आहे.

Tata Play Fiber कडून एक महिना मोफत 1000GB हाय-स्पीड इंटरनेट, जाणून घ्या ऑफर क्लेम करण्याची पद्धत
प्रातिनिधिक फोटो (PS- Tata Play Fiber)
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 5:44 PM

मुंबई : अलीकडेच टाटा स्काय ब्रॉडबँडचे (Tata Sky Broadband) नाव बदलून टाटा प्ले फायबर (Tata Play Fiber) करण्यात आले आहे. नाव बदलल्यानंतर आता कंपनी आपल्या नवीन ग्राहकांना एका महिन्यासाठी 1,150 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन (Broadband Plan) देत आहे. नवीन ‘ट्राय अँड बाय’ (Try and Buy) स्कीम अंतर्गत, हा प्लॅन ग्राहकांना एक महिन्यासाठी मोफत दिला जात आहे, जिथे कंपनी युजर्सना आधी त्यांच्या सेवेच्या गुणवत्तेची चाचणी (सर्विस क्वालिटी ट्रायल) घेण्याचा पर्याय देते आणि नंतर कनेक्शन खरेदी करून ती चालू ठेवण्याचा पर्याय देते. 1,150 रुपयांच्या प्लॅन अंतर्गत, कंपनी आपल्या ग्राहकांना 200 Mbps डाउनलोड आणि अपलोड स्पीडसह हाय-स्पीड इंटरनेट (high-speed internet) कनेक्शन देते.

तथापि, ही स्कीम नवीन ग्राहकांना मोफत उपलब्ध करून दिली जात असली तरी, युजर्सना 1,500 रुपये रिटर्नेबल सिक्योरिटी म्हणून जमा करावे लागतील. ट्राय अँड बाय ही स्कीम कंपनीची प्रमोशनल ऑफर आहे आणि ती फक्त नवी दिल्ली, बंगळुरु, चेन्नई, ग्रेटर नोएडा, मुंबई आणि देशातील निवडक भागात उपलब्ध आहे. ट्राय अंड बाय इनिशिएटिव्ह ग्राहकांना 1000GB हाय-स्पीड डेटा मोफत मिळेल.

परतावा मिळविण्यासाठीच्या अटी कोणत्या?

कंपनीकडून पूर्ण परतावा (रिफंड) मिळविण्यासाठी पात्र होण्यासाठी तुम्ही 30 दिवसांच्या आत कनेक्शन रद्द करणे आवश्यक आहे. तुम्ही 30 दिवसांच्या सेवेनंतर कनेक्शन रद्द केल्यास, तुमच्याकडून 500 रुपये आकारले जातील आणि फक्त 1000 रुपयांचा परतावा मिळेल. याव्यतिरिक्त, वापरकर्त्याला दिलेला परतावा ग्राहक प्रिमाइस इक्विपमेंट (CPE) पुनर्प्राप्तीच्या अधीन आहे.

कनेक्शनसोबतच, Tata Play Fiber वापरकर्त्यांना ट्रायल पीरियडमध्ये मोफत लँडलाइन कनेक्शन देखील दिले जाईल. तुम्हाला टाटा प्ले फायबर सुरू ठेवायचे असल्यास तुम्ही उत्तम ऑफरसाठी पात्र असाल. तुम्ही किमान 3 महिन्यांसाठी 100 Mbps प्लॅन घेण्याचे ठरवल्यास, तुम्हाला 1,500 रुपयांचा पूर्ण परतावा मिळेल. तथापि, तुम्ही 3 महिन्यांसाठी 50 Mbps स्कीम निवडल्यास, तुम्हाला फक्त 500 रुपयांचा परतावा मिळेल, बाकीचे 1,000 रुपये सिक्योरिटी डिपोजिट वॉलेटमध्ये असतील. मंथली स्कीम उपलब्ध असल्यास, तीन महिन्यांच्या अॅक्टिव्ह सर्व्हिसनंतर 1,000 रुपये तुम्हाला परत केले जातील, उर्वरित 500 रुपये सिक्योरिटी डिपॉजिट वॉलेटमध्येच राहतील.

इतर बातम्या

सावधान | ऑनलाईन बँकिंग करत असाल तर जरा इकडे लक्ष द्या, आणि आधी तुमचं बँक अकाऊंट चेक करा…

7700 mAh बॅटरी, मोठा डिस्प्ले, Motorola Moto Tab G70 बाजारात, आजपासून विक्रीला सुरुवात

Free Fire Redeem Codes : ऑनलाईन गेमिंगमधून शानदार रिवॉर्ड्स, कसा करावा क्लेम?

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.