34 तास कॉलिंग बॅटरी बॅकअप, 64GB स्टोरेजसह दमदार स्मार्टफोन बाजारात, किंमत 8 हजारांहून कमी

स्मार्टफोन कंपनी टेक्नोने (TECNO) सोमवारी स्पार्क 8 हा स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली, ज्याची किंमत 7,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

34 तास कॉलिंग बॅटरी बॅकअप, 64GB स्टोरेजसह दमदार स्मार्टफोन बाजारात, किंमत 8 हजारांहून कमी
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 11:10 PM

मुंबई : स्मार्टफोन कंपनी टेक्नोने (TECNO) सोमवारी स्पार्क 8 हा स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली, ज्याची किंमत 7,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनद्वारे TECNO ने 6-10K सेगमेंटमध्ये भारतातील टॉप 5 स्मार्टफोन कंपन्यांमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे आणि कंपनी आपला पोर्टफोलिओ आणखी मजबूत करत आहे. स्पार्क 8 स्मार्टफोन 64 जीबी स्टोरेज सारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. यामध्ये 16 मेगापिक्सलचा हाय रिझोल्यूशन कॅमेरा देण्यात आला आहे. दरम्यान, आजपासून या फोनचा पहिला सेल सुरु झाला आहे. (Tecno Spark 8 available in retail stores for sale from today)

या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची शक्तिशाली बॅटरी देण्यात आली आहे, जी कंपनीच्या म्हणण्यानुसार 47 दिवसांचा स्टँडबाय टाइम, 34 तास कॉलिंग, 19 तास वेब ब्राउझिंग, 132 तास म्युझिक प्लेबॅक आणि 21 तास व्हिडीओ प्लेबॅक प्रदान करते. मेमरी मायक्रोएसडी कार्डने 256GB पर्यंत वाढवता येते. सुपर फास्ट अॅप्लिकेशन अनुभवासाठी स्मार्टफोन LPDDR4x रॅमसह सुसज्ज आहे.

फीचर्स

टेकनो स्पार्क 8 (Tecno Spark 8) प्रीमियम फीलसाठी नवीन मेटल कोडिंग डिझाइनमध्ये येतो आणि त्याची किंमत 7999 रुपये आहे. स्पार्क 8 लाँच केल्यावर, टेक्नो भारतातील तरुणांना लक्ष्य करत आहे. फोनमध्ये 6.52 इंचाचा HD + डॉट नॉच डिस्प्ले आहे जो 120Hz टच रिस्पॉन्स रेटसह येतो. याचा स्क्रीन टू बॉडी रेशो 88.6 टक्के आणि ब्राइटनेस 480 निट्स इतका आहे.

कॅमेरा

सेल्फी प्रेमींसाठी, स्मार्टफोनमध्ये ड्युअल फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो ब्राइट आणि क्लियर सेल्फी क्लिक करतो आणि या कॅमेराद्वारे कमी प्रकाशातही व्हिडिओ कॉल करता येतो. स्पार्क 8 व्हिज्युअली स्लिम फ्रेम, मोठ्या सर्फेस बॅटरी कव्हर डिझाइन आणि मागील कॅमेरा फ्रेम एफपी सेन्सरसह इंटीग्रेटेड आहे जे स्मार्टफोनला एक अनोखा अनुभव देते.

ट्रांसियन इंडियाचे सीईओ अरिजीत तालपात्रा म्हणाले की, “ग्राहकांचे समाधान नेहमीच आमच्या उत्पादनाच्या नावीन्यतेच्या मुळाशी राहिले आहे आणि ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला पुढे नेत आहे. स्पार्क सिरीजसह, आमची रणनीती अशा स्मार्टफोनवर लक्ष केंद्रित करणे आहे की ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह स्मार्टफोन देता येईल.

सेल कधी?

टेकनो स्पार्क 8 रिटेल स्टोअरमध्ये आजपासून (15 सप्टेंबर) तीन आकर्षक रंगांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. यामध्ये तुम्हाला अटलांटिक ब्लू, फिरोजा क्लॅन आणि आयरीस पर्पलचा समावेश असेल.

इतर बातम्या

ट्रिपल कॅमेरा, 5050mAh बॅटरी, नोकियाचा किफायतशीर स्मार्टफोन बाजारात

डुअल फ्लॅशसह सेल्फी, 5000mAh बॅटरी, 64GB स्टोरेजसह 7 हजारांच्या रेंजमध्ये दमदार स्मार्टफोन लाँच

सुरु होतोय Flipkart Big Billion Days सेल, ‘या’ प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काऊंट, जाणून घ्या सर्वकाही

(Tecno Spark 8 available in retail stores for sale from today)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.