डुअल फ्लॅशसह सेल्फी, 5000mAh बॅटरी, 64GB स्टोरेजसह 7 हजारांच्या रेंजमध्ये दमदार स्मार्टफोन लाँच

स्मार्टफोन कंपनी टेक्नोने (TECNO) सोमवारी स्पार्क 8 हा स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली, ज्याची किंमत 7,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

डुअल फ्लॅशसह सेल्फी, 5000mAh बॅटरी, 64GB स्टोरेजसह 7 हजारांच्या रेंजमध्ये दमदार स्मार्टफोन लाँच
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 7:25 PM

मुंबई : स्मार्टफोन कंपनी टेक्नोने (TECNO) सोमवारी स्पार्क 8 हा स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली, ज्याची किंमत 7,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनद्वारे TECNO ने 6-10K सेगमेंटमध्ये भारतातील टॉप 5 स्मार्टफोन कंपन्यांमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे आणि कंपनी आपला पोर्टफोलिओ आणखी मजबूत करत आहे. स्पार्क 8 स्मार्टफोन 64 जीबी स्टोरेज सारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. यामध्ये 16 मेगापिक्सलचा हाय रिझोल्यूशन कॅमेरा देण्यात आला आहे. (Tecno Spark 8 launched With Dual Rear Cameras, Priced at Rs 7,999)

या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची शक्तिशाली बॅटरी देण्यात आली आहे, जी कंपनीच्या म्हणण्यानुसार 47 दिवसांचा स्टँडबाय टाइम, 34 तास कॉलिंग, 19 तास वेब ब्राउझिंग, 132 तास म्युझिक प्लेबॅक आणि 21 तास व्हिडीओ प्लेबॅक प्रदान करते. मेमरी मायक्रोएसडी कार्डने 256GB पर्यंत वाढवता येते. सुपर फास्ट अॅप्लिकेशन अनुभवासाठी स्मार्टफोन LPDDR4x रॅमसह सुसज्ज आहे.

फीचर्स

टेकनो स्पार्क 8 (Tecno Spark 8) प्रीमियम फीलसाठी नवीन मेटल कोडिंग डिझाइनमध्ये येतो आणि त्याची किंमत 7999 रुपये आहे. स्पार्क 8 लाँच केल्यावर, टेक्नो भारतातील तरुणांना लक्ष्य करत आहे. फोनमध्ये 6.52 इंचाचा HD + डॉट नॉच डिस्प्ले आहे जो 120Hz टच रिस्पॉन्स रेटसह येतो. याचा स्क्रीन टू बॉडी रेशो 88.6 टक्के आणि ब्राइटनेस 480 निट्स इतका आहे.

कॅमेरा

सेल्फी प्रेमींसाठी, स्मार्टफोनमध्ये ड्युअल फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो ब्राइट आणि क्लियर सेल्फी क्लिक करतो आणि या कॅमेराद्वारे कमी प्रकाशातही व्हिडिओ कॉल करता येतो. स्पार्क 8 व्हिज्युअली स्लिम फ्रेम, मोठ्या सर्फेस बॅटरी कव्हर डिझाइन आणि मागील कॅमेरा फ्रेम एफपी सेन्सरसह इंटीग्रेटेड आहे जे स्मार्टफोनला एक अनोखा अनुभव देते.

ट्रांसियन इंडियाचे सीईओ अरिजीत तालपात्रा म्हणाले की, “ग्राहकांचे समाधान नेहमीच आमच्या उत्पादनाच्या नावीन्यतेच्या मुळाशी राहिले आहे आणि ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला पुढे नेत आहे. स्पार्क सिरीजसह, आमची रणनीती अशा स्मार्टफोनवर लक्ष केंद्रित करणे आहे की ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह स्मार्टफोन देता येईल.

सेल कधी?

टेकनो स्पार्क 8 रिटेल स्टोअरमध्ये 15 सप्टेंबर 2021 पासून तीन आकर्षक रंगांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. यामध्ये तुम्हाला अटलांटिक ब्लू, फिरोजा क्लॅन आणि आयरीस पर्पलचा समावेश असेल.

इतर बातम्या

जिच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं लॉबिंग केलं होतं, त्या ‘फोर्ड’नं देशातून गाशा का गुंडाळला? वाचा सविस्तर

Yamaha ची शानदार फेस्टिव्ह ऑफर, ग्राहकांना 1 लाखाचं बक्षीस जिंकण्याची संधी

Royal Enfield च्या ग्राहकांना झटका, Meteor 350 नंतर आता ‘या’ बाईकची किंमत वाढली

(Tecno Spark 8 launched With Dual Rear Cameras, Priced at Rs 7,999)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.