Realme C33 : 50 MP कॅमेरासह लाँच झाला रिअलमीचा बजेट स्मार्टफोन…

रिअलमीने आपल्या बजेट सी सीरीजअंतर्गत हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या बजेट फोनमध्ये अनेक खास फीचर्स दिले आहेत. त्यामुळे हा बजेट फोन असूनही प्रीमिअम क्वॉलिटीसारखा भासतो. यात तब्बल 50 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme C33 : 50 MP कॅमेरासह लाँच झाला रिअलमीचा बजेट स्मार्टफोन...
स्मार्टफोनImage Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 6:48 PM

मुंबई : रिअलमीच्या युजर्ससाठी एक खुशखबर आहे. कंपनीकडून नुकताच रिअलमी सी33 (Realme C33) हा बजेट स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. हा नवीन फोन कंपनीने आपल्या बजेट सी सीरीजअंतर्गत लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या महत्वाच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन 50 मेगापिक्सेल AI कॅमेरा (camera) सेंसरसह लाँच करण्यात आला आहे. कमी किमतीतही या फोनचा लूक अतिशय स्टायलिश ठेवण्यात आला आहे. त्याच सोबत बजेट सेगमेंटमध्ये असूनही यात अत्याधुनिक फीचर्स (Advanced features) देण्यात आली आहेत. या लेखाच्या माध्यमातून त्याचे फीचर्स, भारतातील किंमत आदींविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

  • Realme C33 स्पेसिफिकेशन्स
  • डिस्प्ले : 400 nits पीक ब्राइटनेससह 6.5 इंचाचा डिस्प्ले दिलेला आहे. हा फोन 120 Hz टच सॅम्पलिंग रेट ऑफर करतो.
  • प्रोसेसर : या बजेट फोनमध्ये Unisock T612 चिपसेट वापरण्यात आला आहे.
  • रॅम : Realme C33 स्मार्टफोन 3 जीबी आणि 4 जीबी रॅम पर्यायांसह लाँच करण्यात आला आहे.
  • कॅमेरा : फोनच्या मागील पॅनलवर 50 मेगापिक्सलचा AI कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 5 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
  • स्टोरेज : फोन 32 जीबी आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे.
  • बॅटरी : या बजेट फोनमध्ये तब्बल 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.
  • सॉफ्टवेअर : Realme ब्रँडचा हा नवीन बजेट फोन Android 12 वर बॉक्सच्या बाहेर काम करतो.

काय आहे किंमत

या रियलमी मोबाईल फोनच्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 8999 रुपये आहे. फोनच्या 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज देणाऱ्या मॉडेलची किंमत 9,999 रुपये आहे. फोनचे तीन कलर व्हेरिएंट लाँच केले गेले आहेत, यात, ॲक्वा ब्ल्यू, सॅन्डी गोल्ड, आणि नाइट सीचा समावेश आहे. फोनची विक्री Flipkart व्यतिरिक्त Realme च्या अधिकृत साइटवर 12 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.