50MP ट्रिपल कॅमेरा, किफायतशीर किंमत, Vivo Y21T ठरणार नव्या वर्षात लाँच होणारा पहिला स्मार्टफोन

नव्या वर्षातील पहिला स्मार्टफोन सोमवारी, 3 जानेवारी रोजी भारतात लॉन्च केला जाऊ शकतो, ज्याचे नाव Vivo Y21T असे असणार आहे. या फोनची माहिती नुकतीच समोर आली आहे.

50MP ट्रिपल कॅमेरा, किफायतशीर किंमत, Vivo Y21T ठरणार नव्या वर्षात लाँच होणारा पहिला स्मार्टफोन
Vivo phone (Photo : Vivo website)
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 5:35 PM

मुंबई : नवीन वर्षात भारतात अनेक लेटेस्ट आणि चांगले फीचर्स असणारे फोन लाँच होणार आहेत. यात भारतातील पहिला रंग बदलणारा (कलर चेंजिंग) फोन लाँच होईल जो Vivo चा फोन असेल आणि दुसरा फोन Xiaomi चा असेल, जो भारतातील सर्वात फास्ट चार्ज होणारा फोन आहे. आता या सेगमेंटमध्ये आणखी एक फोन समाविष्ट होणार आहे, जो 3 जानेवारीला सादर केला जाऊ शकतो. (The Vivo Y21T will be first smartphone to be launched in 2022)

नव्या वर्षातील पहिला स्मार्टफोन सोमवारी, 3 जानेवारी रोजी भारतात लॉन्च केला जाऊ शकतो, ज्याचे नाव Vivo Y21T असे असणार आहे. या फोनची माहिती नुकतीच समोर आली आहे आणि आता या फोनचे रेंडर देखील समोर आले आहे. माय स्मार्ट प्राइसद्वारे हे नवीन रेंडर लीक केले गेले आहेत. Vivo Y21T मध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा असेल. हा फोन या महिन्याच्या सुरुवातीला चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

Vivo Y21T च्या लीक झालेल्या रेंडर्सनुसार, समोर एक वॉटरड्रॉप नॉच असेल, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा असेल. डिस्प्लेच्या वर उजव्या बाजूला पॉवर बटणे आहेत. यात फिंगरप्रिंट स्कॅनरही मिळेल. यामध्ये कॅमेरा सेटअप स्क्वेअर शेपमध्ये देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल्सचा असेल आणि एलईडी फ्लॅशलाइट्स असतील. रेंडरमध्ये हा फोन निळ्या रंगात दाखवला आहे.

Vivo Y21T चे संभाव्य फीचर्स आणि किंमत

Vivo Y21T च्या संभाव्य स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.5 इंचाचा LCD डिस्प्ले आहे. हा फुल एचडी+ रिझोल्युशन डिस्प्ले आहे, जो 60Hz चा रिफ्रेश रेटसह लाँच होऊ शकतो. स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट सह येणारा हा पहिला स्मार्टफोन असू शकतो.

Vivo Y21T चा संभाव्य RAM आणि प्रोसेसर

कदाचित Vivo Y21T मध्ये 4 GB RAM आणि 1 GB RAM एक्सटेन्शनची सुविधा मिळेल. तसेच यात 128 GB इंटरनल स्टोरेज मिळेल. या फोनला Android 11 OS सपोर्ट मिळेल, जो कस्टमाईज्ड Funtouch OS UI वर काम करेल. अतिरिक्त स्टोरेजच्या गरजेसाठी कंपनीने मायक्रोएसडी कार्ड इन्स्टॉल करण्याचा पर्याय दिला आहे.

Vivo Y21T चा संभाव्य कॅमेरा सेटअप

या फोनच्या कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे, जो f/1.8 अपर्चर सह येतो. यात 2-2 मेगापिक्सल्सचा सेकेंडरी आणि तिसरा कॅमेरा आहे. यात 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील आहे, जो व्हिडीओ कॉलिंगसाठीही उपयुक्त आहे.

Vivo Y21T मधील बॅटरी

Vivo ने या मोबाईलमध्ये 5,000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगसह येते. यामध्ये त्याचे वजन 182 ग्रॅम आहे. तर, या फोनची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.

इतर बातम्या

Vodafone Idea चे Disney+ Hotstar बेनिफिटवाले प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद, जाणून घ्या डिटेल्स

सर्वात जलद चार्ज होणाऱ्या Xiaomi 11i HyperCharge ची लाँच डेट जाहीर, किंमत…

फ्लॅगशिप प्रोसेसर, 60MP कॅमेरासह Moto चा शानदार स्मार्टफोन भारतात लाँचिंगसाठी सज्ज

(The Vivo Y21T will be first smartphone to be launched in 2022)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.