ही 5 लक्षणं दिसत असली तर समजा तुमचा फोन हॅक झालाय

स्मार्टफोन हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा असतो. कारण त्यामध्ये प्रत्येक जण महत्त्वाची माहिती ठेवत असतो. त्यामुळे फोन हॅक होऊ नये किंवा हॅक झाल्यास काय करावे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ही 5 लक्षणं दिसत असली तर समजा तुमचा फोन हॅक झालाय
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 5:32 PM

मुंबई : फोन हॅक होण्याचं प्रमाण वाढत आहे. हॅकर्स तुमचा फोन हॅक करून तुमचा डेटा चोरु शकतात. ज्याचा मोठा फटका तुम्हाला बसू शकतो. हॅकर्स फसवणुकीचे वेगवेगळे मार्ग शोधत असतात. ज्यामुळे डेटा चोरण्याचं प्रमाण वाढलं आहे. कधी-कधी असंही होतं की फोन हॅक झालाय हे आपल्याला समजत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत जेणे करुन तुमचा फोन हॅक झालाय का हे तुम्हाला कळणार आहे.

1. हॅकर्स कधीकधी हेरगिरी करण्यासाठी पॅरेंटल कंट्रोल अॅप्ससारख्या प्रोग्रामचा गैरवापर करतात. म्हणून, तुमच्या फोनमध्ये असे कोणतेही अपरिचित अॅप्लिकेशन असतील जे तुम्ही डाउनलोड केलेले नाही. के काढून टाका. अशा अॅप्समध्ये Net Nanny, Kaspersky Safe Kids, Norton Family यांचा समावेश आहे.

2. स्पायवेअर सतत तुमचा डेटा संकलित करतो. ज्यामुळे काही अॅप सतत बॅकग्राऊंडला चालू असतात. हे सूचित करते की जेव्हा हे रॉग सॉफ्टवेअर बॅकग्राउंडमध्ये चालू असते तेव्हा डिव्हाइसेसची गती कमी होते. त्यामुळे तुमचा फोन स्लो होतो. अशा वेळी असे अॅप शोधून तुम्ही डिलीट करु शकता.

3. जर मालवेअर सतत काम करत असेल तर तुमची बॅटरी सामान्यपेक्षा वेगाने डिस्चार्ज होऊ लागते. जर असं अचानक होऊ लागलं तर समजा तुमचा फोन हॅक झाला आहे.

4. तुमचा फोन गरम होत असल्यास, बॅकग्राऊंडला स्पायवेअर चालवून कोणीतरी तुमची हेरगिरी करत असल्याचे हे लक्षण असू शकते. विशेषतः जेव्हा तुम्ही फोन वापरत नसाल आणि तुमचा फोन अजून गरम होत असेल.

5.काहीवेळा, तुमच्या फोनद्वारे वापरल्या जाणार्‍या डेटाच्या प्रमाणात अचानक वाढ होणे हे मालवेअर सक्रिय असल्याचे लक्षण आहे. डेटा वापरात वाढ हे फसवणुकीचे लक्षण असू शकते कारण गुप्तचर अॅप्सना गुन्हेगारांपर्यंत माहिती प्रसारित करण्यासाठी डेटा आवश्यक असतो.

फोन हॅक होऊ नये म्हणून काय करावे?

तुमच्या Android फोनवरून स्पायवेअर काढून टाकण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे योग्य सॉफ्टवेअर वापरणे. परंतु लक्षात ठेवा की केवळ ज्ञात कंपन्यांचे सॉफ्टवेअर वापरा. याशिवाय फोनचा व्हायरस फॅक्टरी रिसेट करूनही काढता येतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही अनधिकृत लिंक किंवा अज्ञात स्त्रोतावरून कोणतेही अॅप कधीही डाउनलोड करू नका.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.