कार पार्किंग करताना उंदरांची भीती? वाचा घरगुती उपाय, उंदीर होतील छू मंतर!
कार मध्ये उंदीर घुसतोय की काय अशी भीती! एकदा का उंदीर कारमध्ये घुसला की मग कार्यक्रमच! मग आता हा कार्यक्रम थांबवायचा कसा? म्ही हे घरगुती उपाय करून बघा, यानंतर तुम्ही गाडी कुठेही पार्क करू शकता. हे उपाय घरगुती आणि कमी बजेटमध्ये असणारे उपाय आहेत. बघुयात काय आहेत हे उपाय...

मुंबई: कार पार्किंग करायची म्हणजे सोपं काम आहे का? यात असंख्य समस्या आहेत. आता या समस्या जे कार पार्क करतात त्यांनाच माहित. आधी तर गाडी पार्क करण्यासाठी जागा शोधा. गाडीला सावली आहे का, मग पार्क केल्यावर गाडी तापेल का? मग ती पार्किंग मधून काढणं सोपं जाईल का? कितीवेळ आपण गाडी पार्क करणार आहोत? मग ती जागा स्वच्छ आहे का? आपली गाडी कुणी उचलून तर नेणार नाही ना? अशा असंख्य समस्या! पण अशी एक समस्या आहे जी प्रत्येकाला कार पार्क करताना येते. कोणती समस्या असावी? कार मध्ये उंदीर घुसतोय की काय अशी भीती! एकदा का उंदीर कारमध्ये घुसला की मग कार्यक्रमच! मग आता हा कार्यक्रम थांबवायचा कसा? उंदीर कारमध्ये येऊ नये म्हणून काय उपाय करावेत? वाचा
काय आहेत हे उपाय…
तुम्ही यावर उपाय म्हणून काही घरगुती उपाय करू शकता. या उपायांमध्ये नेप्थलीन बॉल्स, तंबाखूची पाने, रेट रिपेलेट स्प्रे यांचा समावेश आहे. तुम्ही हे घरगुती उपाय करून बघा, यानंतर तुम्ही गाडी कुठेही पार्क करू शकता. हे उपाय घरगुती आणि कमी बजेटमध्ये असणारे उपाय आहेत. बघुयात काय आहेत हे उपाय…
नेप्थलीन बॉल्स: तुम्हाला नेप्थलीन बॉल्स माहित आहेत का? तेच जे पांढऱ्या रंगाचे असतात जे आपण बेसिनमध्ये ठेवतो कधी किचनच्या सिंकमध्ये ठेवतो तर कधी बाथरूमच्या खिडक्यांमध्ये ठेवतो. हेच नेप्थलीन बॉल्स तुम्ही कारमध्ये ठेऊ शकता. कारच्या बूट स्पेसमध्ये नेप्थलीन बॉल्स ठेवा आणि फरक बघा.
अनडायल्यूटेड फिनाइल: कारच्या इंजिनमध्ये अनडायल्यूटेड फिनाइल शिंपडा. अनडायल्यूटेड फिनाइलमुळे तुमच्या कारची उंदरांपासून सुटका होईल.
तंबाखूची पाने: तंबाखूची पाने कारच्या इंजिनजवळ ठेवली तर कारमध्ये उंदीर घुसण्याची शक्यता फार कमी असते. कारच्या डिक्कीमध्ये सुद्धा तुम्ही तंबाखूची पाने ठेऊ शकता. तंबाखूच्या पानांचा वास उंदरांना पळवून लावतो.
रेट रिपेलेंट स्प्रे: रेट रिपेलेंट स्प्रे कुठल्याही ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवर मिळू शकतो. फ्लिपकार्ट अमेझॉन सारख्या ऑनलाइन वेबसाईटवरून हा स्प्रे मागवा. कारमध्ये या स्प्रे ची फवारणी केल्यावर उंदरांची समस्या दूर होईल. हा स्प्रे वापरताना आपल्या मुलांना आणि वृद्धांना यापासून दूर ठेवा, हे खूप धोकादायक ठरू शकते.