Budget 2022: संपूर्ण अर्थसंकल्प पाहायचाय? तुमच्या फोनवर डाऊनलोड करा Budget PDF डॉक्यूमेंट

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज (1 फेब्रुवारी 2022) सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर केला. तब्बल 60 लाख नव्या नोकऱ्या, 400 नव्या वंदे भारत ट्रेन अशा धडाकेबाज घोषणांनी त्यांनी बजेटची (Budget 2022) ओपनिंग केली.

Budget 2022: संपूर्ण अर्थसंकल्प पाहायचाय? तुमच्या फोनवर डाऊनलोड करा Budget PDF डॉक्यूमेंट
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 1:38 PM

नवी दिल्लीः अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज (1 फेब्रुवारी 2022) सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर केला. तब्बल 60 लाख नव्या नोकऱ्या, 400 नव्या वंदे भारत ट्रेन अशा धडाकेबाज घोषणांनी त्यांनी बजेटची (Budget 2022) ओपनिंग केली. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्राशी संबंधित, टॅक्स, स्टार्टअप्स आणि डिजीटल रुपीसंदर्भात अनेक घोषणा केल्या. दरम्यान, संपूर्ण अर्थसंकल्पाचे दस्तऐवजही अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लवकरच सर्वसामान्यांसाठी युनियन बजेट मोबाईल अॅपवर (Union Budget Mobile App) उपलब्ध होईल. ज्यांना संपूर्ण अर्थसंकल्प पाहायचा आहे ते युजर्स हे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन बजेट पाहू शकतील. हे अॅप्लिकेशन अँड्रॉइड आणि आयओएस स्मार्टफोनसाठी उपलब्ध आहे जिथे संसदेत सादर केलेली सर्व कागदपत्रे लोकांसाठी विनामूल्य उपलब्ध असतील.

बजेट 2022 चे दस्तऐवज डाउनलोड करण्यासाठी आणि अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्द्यांचा मागोवा घेण्यासाठी, युजर्सना अॅपवर लॉग इन किंवा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या Union Budget Mobile App वर युजर्स सर्व माहिती मिळवू शकतात. हे युजर फ्रेंडली अॅप असल्याचे म्हटले आहे. मोबाईल अॅप व्यतिरिक्त, सर्व बजेट डॉक्यूमेंट Union Budget Web Portal वर (www.indiabudget.gov.in) वर डाउनलोड करण्यासाठी देखील उपलब्ध असतील.

युनियन बजेट मोबाइल अॅप कसे डाउनलोड करू करायचे? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

  • Android आणि iOS युजर्स इंटरनेट कनेक्शन असलेल्या मोबाईलवर Google Play Store किंवा Apple App Store ला भेट देऊ शकतात
  • Play Store वर Union Budget Mobile App सर्च करा
  • युजर्स NIC e-gov मोबाइल अॅप्सद्वारे Union Budget app सर्च करु शकतात. तिथूनही अॅप डाउनलोड करता येईल.
  • युजर्स Union Budget app पोर्टल www.indiabudget.gov.in ला देखील भेट देऊ शकतात. मोबाईल अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी एक लिंक तेथेही देण्यात आली आहे.
  • लिंकवर क्लिक केल्यानंतर/ इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही Google Play Store किंवा Apple अॅप स्टोअरवरुन थेट अॅपवर जाऊ शकता.

दुसरे पेपरलेस बजेट

‘Union Budget Mobile App’ हा डिजिटल सुविधेचा सर्वात सोपा प्रकार वापरून खासदार आणि सामान्य जनतेला अर्थसंकल्प दस्तऐवजांचा अॅक्सेस मिळवण्यासाठी गेल्या वर्षी 23 जानेवारी रोजी लॉन्च करण्यात आला होता. कोविड-19 महामारीच्या काळात, हे दुसरे पेपरलेस बजेट आहे जिथे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पारंपारिक ‘बही खाता’ (कागदी दस्तऐवज) हा प्रकार सोडून आणि त्याच्या जागी मेड इन इंडिया टॅबलेट सादर केला आहे.

इतर बातम्या

BUDGET 2022: क्रिप्टो करन्सीवर सरकारचा मोठा निर्णय, पुढच्या वर्षीपासून आरबीआय डिजीटल रुपी आणणार

Budget 2022 | झिरो बजेट शेती ते केमिकल मुक्त शेती, मोदी सरकारच्या बजेटमध्ये शेतीचा रोड मॅप काय?

BUDGET 2022: 60 लाख नव्या नोकऱ्या, 400 वंदे भारत ट्रेन; बजेटची ओपनिंग धडाकेबाज घोषणांनी!

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.