USB Type-C: टॅब्लेट, स्मार्टफोन, लॅपटॉप सगळ्यासाठी आता एकच चार्जर! भारी ना?

या बैठकीत USB Type-C चार्जिंग पोर्टचा वापर टॅब्लेट, स्मार्टफोन आणि लॅपटॉप सारख्या स्मार्ट डिव्हाइससाठी केला जाईल यावर एकमत झाले.

USB Type-C: टॅब्लेट, स्मार्टफोन, लॅपटॉप सगळ्यासाठी आता एकच चार्जर! भारी ना?
USB Type CImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 12:44 PM

भारतात वेगवेगळ्या चार्जरचा त्रास संपणार आहे. स्मार्ट डिव्हाइससाठी सामान्य चार्जिंग पोर्ट USB-C वापरला जाईल. याबाबत कंपन्यांमध्ये एकमत झाले आहे.आता लोकांना प्रत्येक वेळी नवीन डिव्हाइससह नवीन चार्जर घेण्याची आवश्यकता भासणार नाही. म्हणजेच आता देशातील सर्व स्मार्ट डिव्हाइससाठी एकच चार्जर काम करेल.

उपभोक्ता सचिव रोहित कुमार सिंह यांनी ही माहिती दिली आहे. एका बैठकीत त्यांनी सांगितले आहे की, स्टेकहोल्डर्सने स्मार्ट डिव्हाइससाठी कॉमन चार्जिंग पोर्टलला सहमती दाखविली आहे. या संमतीनंतर आता कॉमन चार्जिंग पोर्टलचा मार्ग मोकळा झाल्याचं म्हटलं जातंय.

कमी किंमतीच्या फीचर फोनसाठी हा पोर्ट वेगळा असू शकतो. या सगळ्यामुळे ई-कचराही कमी होईल. ASSOCHAM-EY च्या अहवालात  2021 या वर्षात भारतात 50 लाख ई-कचरा निर्माण झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आपण चीन आणि अमेरिकेच्या मागे आहोत.

या बैठकीत USB Type-C चार्जिंग पोर्टचा वापर टॅब्लेट, स्मार्टफोन आणि लॅपटॉप सारख्या स्मार्ट डिव्हाइससाठी केला जाईल यावर एकमत झाले. स्टेकहोल्डर्सनी याला सहमती दर्शविली. फीचर फोनसाठी दुसऱ्या पोर्टचाही अवलंब केला जाऊ शकतो.

अलिकडेच युरोपियन युनियनने सर्व प्रकारच्या उपकरणांसाठी टाइप-सी चार्जिंग पोर्टला मान्यता दिली आहे. आता सगळीकडे अशीच उपकरणे विकली जाणारी जी यूएसबी टाइप-सी पोर्टसह येतील. सध्या बहुतांश फोनमध्ये ही पोर्ट्स दिली जातात.

एका रिपोर्टनुसार, ॲपल आपला आगामी आयफोन यूएसबी टाइप-सी पोर्टसोबत सादर करणार आहे. सध्या कंपनी लाइटनिंग पोर्टचा वापर करते.कॉमन चार्जर असल्याने चार्जर बाळगण्याची गरजही कमी होईल.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.