AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AC : गर्मीतही कारला ठेवा ठंडा ठंडा कूल कूल… या टीप्स फॉलो करा

गर्मीमध्ये तुम्ही कार ड्रायव्हिंग करीत असाल आणि गर्मीमुळे तूमचा एसीदेखील नीट काम करीत नसेल तर अशा वेळी आम्ही तुम्हाला कार कशी थंड ठेवता येईल, याबाबत माहिती देणार आहोत.

AC : गर्मीतही कारला ठेवा ठंडा ठंडा कूल कूल... या टीप्स फॉलो करा
CAR ACImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 1:42 PM

मुंबई : पावसाळा तोंडावर आला असला तरी राज्यासह भारतात उष्णतेला लाट कायम आहे. ज्या ठिकाणी काही प्रमाणात पाउस झालाय, अशा ठिकाणीही पुन्हा गर्मी जाणवत आहे. जर अशा गर्मीमध्ये तुम्ही कार ड्रायव्हिंग (summer drive) करीत असाल आणि गर्मीमुळे तूमचा एसीदेखील (AC) नीट काम करीत नसेल तर अशा वेळी आम्ही तुम्हाला कार कशी थंड ठेवता येईल, याबाबत माहिती देणार आहोत. अनेकदा कारमध्ये गार वाटत नसल्याने असा प्रवास (Travel) नकोसा वाटत असतो. याशिवाय अनेकांना कारमधील दमट व गरम हवामानामुळे जीव घाबरल्यासारखं होत, काहींना उलटीचाही त्रास सहन करावा लागत असतो. त्यामुळे तुम्हाला प्रवासादरम्यान वारंवार ब्रेक घेउन कारच्या बाहेर निघून मोकळ्या हवेत जावे लागत असते. परंतु या टीप्स फॉलो केल्यास तुमची कार थंड राहण्यास मदत होईल.

एसी चेक करुन गरजेनुसार कुलेंट बदला

सर्वात आधी तुमच्या कारमध्ये लावण्यात आलेला एसी काम करीत नसेल तर त्याला मॅकेनिकला दाखवा. एसीमध्ये काही अडचण नसेल तर कारमधील कुलेंट तपासून गरजेनुसार ते बदलावे.

हे सुद्धा वाचा

इंजिनच्या कुलेंटला बदला

कारचे रेडिएटरमध्ये वापरण्यात येणारा कुलेंट वेळोवेळी चेक करणे आवश्‍यक असते. कारमधील इंजिन वेगाने गरम होत असतो. त्यामुळे त्याच्या रेडिएटरला थंड ठेवण्यासाठी कुलेंटची अत्यंत आवश्‍यकता असते. जर कुलेंट योग्य प्रमाणात नसेल तर, इंजिन गर्मीमुळे अजूनच गरम होईल, व अशा पध्दतीने इंजिनचे नुकसान होईल व एसीदेखील काम करणार नाही.

कारच्या खिडक्या हलक्या उघड्या ठेवा

जर तुम्ही उन्हात गाडी पार्क केली असेल तर तुमच्या कारच्या खिडक्या काही प्रमाणात उघड्या ठेवाव्यात, यामुळे कारमधील दमट व गरम हवा बाहेर पडेल. ज्या वेळी तुम्ही कारमध्ये बसाल तेव्हा त्यातील हवा खेळती राहिल्याने गर्मी होणार नाही.

शेड खालीच कार पार्क करा

कुठेही कार पार्किंग करत असताना नेहमी कोणत्या तरी शेडखाली कारची पार्किंग करावी. त्यामुळे संपूर्ण कार थंड राहण्यास मदत होईल. नंतर तुम्ही एसी ऑन केल्यानंतर कार त्वरित थंड होण्यास मदत होईल.

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...