व्हॅलेंटाईन डे निमित्त WhatsApp चं खास स्टिकर, प्रेम व्यक्त करणं आणखी होणार सोपं
WhatsApp Valentine Stickers: व्हॅलेंटाईन डेला आपल्या प्रिय व्यक्तीपर्यंत भावना पोहोचवण्यासाठी व्हॉट्सअॅपनं नामी शक्कल शोधून काढली आहे. यासाठी खास स्टिकर्सची मेजवानी युजर्संना मिळणार आहे. चला जाणून घेऊयात हे स्टिकर्स कसे डाउनलोड करायचे ते..
मुंबई : 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. या दिवशी प्रेमाची कबुली देणं इतर दिवसांपेक्षा सोपं असतं, अशी तरुणाईमध्ये समज आहे. यासाठी तरुण तरुणी आपल्या प्रिय व्यक्तीसाठी खास गिफ्ट वगैरे घेतात. दुसरीकडे, सोशल मीडियाचा काळ असून आपलं प्रेम व्यक्त करणं आणखी सोपं माध्यम झालं आहे. व्हॉट्सअॅप हे संवादाचं सर्वाधिक लोकप्रिय अॅप आहे. या माध्यमातून प्रिय व्यक्तींसी संवाद साधणं आणखी सोपं होतं. यासाठी व्हॉट्सअॅपनं एक खास स्टिकर लाँच केलं आहे. या स्टिकर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करू शकता. हे स्टिकर अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे. इतकंच काय तर फ्रीमध्ये शेअर करू शकता.आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा विश करण्यासाठी व्हॉट्सअॅपचं हे फीचर नक्कीच कामी येईल. विशेष म्हणजे यात फक्त एकच स्टिकर नसून अजून बरंच काही आहे. या माध्यमातून तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करू शकता.
Android आणि iOS डिव्हाइसवर असे डाउनलोड कराल स्टिकर्स
- तुमच्या अँड्रॉईड किंवा आयओएस डिव्हाइसवर व्हॉट्सअप उघडा.यानंतर ज्या कॉन्टॅक्टवर तुम्हाला व्हॅलेंटाईन डे स्टिकर्स शेअर करायचे आहेत त्यावर क्लिक करा.
- आता WhatsApp वर सर्व फर्स्ट पार्टी स्टिकर पॅक ऍक्सेस करण्यासाठी प्लस आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर प्रेम आणि व्हॅलेंटाईन डेचे स्टिकर्स शोधा.यानंतर, डाउनलोड आयकॉनवर क्लिक करा. संपूर्ण स्टिकर पॅक तुमच्या फोनवर डाउनलोड होईल.
- आता तुम्ही हे स्टिकर्स व्हॉट्सअॅपवर कोणत्याही यूजरसोबत शेअर करू शकता.
- व्हॅलेंटाईन डे स्टिकर पॅक डाउनलोड केल्यानंतर विशिष्ट WhatsApp चॅटवर जा आणि मेनूमधून शेअर स्टिकर निवडा. तुम्ही एका वेळी अनेक व्हॉट्सअॅप स्टिकर्स शेअर करू शकता.
याच पद्धतीने तुम्ही अॅपल अॅप स्टोर आणि गुगल प्ले स्टोरवरून थर्ड पार्टी व्हॉट्सअॅप स्टिकर अॅप डाउनलोड करू शकता. यासाठी चॅट अॅपसाठी Sticker.ly, Sticker Maker + Stickers, Stickles आणि Wsticker यांचा समावेश आहे. हे अॅप्स दोन्ही प्लॅटफॉर्मवर मोफत आहे. यात व्हॅलेंटाईन थीमची मोठी लिस्ट आहे.