वोडाफोनचे नवे प्लॅन्स, दररोज 4GB डेटा मिळणार, सोबत मोफत टीव्ही शो आणि चित्रपटही पाहा

जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी VI कंपनीने नवे आणि किफायतशीर डेटा प्लॅन्स सादर केले आहेत.

वोडाफोनचे नवे प्लॅन्स, दररोज 4GB डेटा मिळणार, सोबत मोफत टीव्ही शो आणि चित्रपटही पाहा
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 8:39 AM

मुंबई : ग्राहकांच्या संख्येच्या बाबतीत भारतीय मार्केटमध्ये वोडाफोन आयडिया (VI) कंपनी सध्या रिलायन्स जियो आणि एअरटेलच्या मागे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने नवे आणि किफायतशीर डेटा प्लॅन्स सादर केले आहेत. या प्लॅन्सची वैधता 28 दिवस, 56 दिवस आणि 84 दिवसांपर्यंत आहे. हे प्लॅन्स युजर्सच्या पसंतीस उतरले आहेत. या प्लॅन्समध्ये कंपनीकडून दुप्पट डेटासह युजर्सना डेटा रोलओव्हरची सुविधा देण्यात आली आहे. तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल आणि इतर वेळी तसेच विकेंडला मुव्हीज, शोज स्ट्रीम करत असाल तर तुमच्यासाठी हे प्लॅन्स उत्तम आहेत. आज आम्ही तुम्हाला वोडाफोन-आयडियाच्या नव्या प्लॅन्सबाबत माहिती देणार आहोत. (Vi Rs 299, Rs 449 and Rs 699 prepaid plans offer 4GB daily data with weekend rollover benefit)

वोडाफोनने सादर केलेल्या नव्या प्लॅन्सच्या यादीतील पहिला प्लॅन 299 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2+2 म्हणजेच 4 जीबी डेटा दिला जात आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांपर्यंत आहे. 28 दिवसांमध्ये युजर्सना तब्बल 112 जीबी डेटा दिला जात आहे. सोबतच या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. दरम्यान कंपनीने नुकतीच डेटा रोलओव्हरची सुविधादेखील देऊ केली आहे. या प्लॅनसोबतच कंपनी 125 रुपयांचा बोनस कॅशदेखील देत आहे. याद्वारे तुम्ही एमपीएल (मोबाईल गेम) खेळू शकता. तसेच झोमॅटोवरुन कोणतेही पदार्थ ऑर्डर करत असाल तर 75 रुपयांचा डिस्काऊंट दिला जातोय. या प्लॅनमध्ये तुम्ही मोफत टीव्ही आणि चित्रपट पाहू शकता.

कंपनीने 449 रुपयांचा प्रिपेड प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये 56 दिवसांसाठी दररोज 4 जीबी डेटा दिला जातोय. म्हणजेच 56 दिवसांसाठी 224 जीबी डेटा दिला जातोय. सोबतच या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस आणि सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. दरम्यान कंपनीने नुकतीच डेटा रोलओव्हरची सुविधादेखील देऊ केली आहे. म्हणजेच जर तुम्ही संपूर्ण डेटाचा वापर केला नाही तर तो डेटा तुम्हाला तुमच्या पुढील महिन्यातील डेटासोबत मिळेल.

कंपनीने 699 रुपयांचा प्रिपेड प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनची वैधता 84 दिवसांपर्यंत आहे. या प्लॅनमध्येदेखील दररोज 2+2 म्हणजेच 4 जीबी डेटा दिला जात आहे. 84 दिवसांमध्ये युजर्सना तब्बल 336 जीबी डेटा दिला जात आहे. सोबतच आधीच्या प्लॅन्ससोबत देण्यात आलेल्या सर्व सुविधा (फ्री कॉलिंग, दररोज 100 एसएमएस, डेटा रोलओव्हर) दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

Jio vs Airtel vs Vi : सर्वात स्वस्त 1GB डेली डेटा प्लॅन कोणाचा?

Airtel आणि Jio ला टक्कर देण्यासाठी BSNL चा नवा प्लॅन, दुप्पट डेटा मिळणार

पुढील वर्षी 5G नेटवर्क भारताचं नशीब बदलणार? सरकारचे प्रयत्न सुरु

(Vi Rs 299, Rs 449 and Rs 699 prepaid plans offer 4GB daily data with weekend rollover benefit)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.