108MP कॅमेरा, डुअल सेल्फी कॅमरासह पहिला कलर चेंजिंग स्मार्टफोन भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फीचर्स

Vivo India आपला नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे, ज्याचे नाव Vivo V23 सीरीज असे आहे. या सीरीज अंतर्गत कंपनी नवीन आणि लेटेस्ट फोन लाँच करणार आहे. या फोनमध्ये अनेक चांगले फीचर्स उपलब्ध असतील,

108MP कॅमेरा, डुअल सेल्फी कॅमरासह पहिला कलर चेंजिंग स्मार्टफोन भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फीचर्स
Vivo V23 series
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 5:01 PM

मुंबई : Vivo India आपला नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे, ज्याचे नाव Vivo V23 सीरीज असे आहे. या सीरीज अंतर्गत कंपनी नवीन आणि लेटेस्ट फोन लाँच करणार आहे. या फोनमध्ये अनेक चांगले फीचर्स उपलब्ध असतील, ज्याबद्दल कंपनीने स्वतः आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरून माहिती दिली आहे. Vivo India ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट केले आहे की ते 108 मेगापिक्सलचा अल्ट्रा-क्लेयरिटी कॅमेरा असलेला फोन आणत आहेत. (Vivo V23 series to be launched January 5 with color-changing back panels on)

याशिवाय Vivo V23 सीरीजबद्दल आतापर्यंत बरीच माहिती समोर आली आहे. कंपनीने 1 जानेवारी रोजी एका ट्विटमध्ये माहिती दिली होती की, या फोनचा सेल्फी अधिक शायनिंग असेल. ज्यामध्ये ड्युअल टोन स्पॉट लाईट सेल्फी कॅमेरा दिसेल. वास्तविक, या ट्विटमध्ये कंपनीने फोनचा टॉप फ्रंट दाखवला आहे, ज्यामध्ये दोन सेल्फी कॅमेरा सेन्सर दिसत आहेत, त्याशिवाय दोन लाइट्सही दिसत आहेत.

भारतातील पहिला रंग बदलणारा फोन

Vivo V23 फोन भारतातील पहिला रंग बदलणारा स्मार्टफोन (कलर चेजिंग फोन) असेल. कंपनीने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सांगितले की हा भारतातील पहिला रंग बदलणारा फोन असेल. या फोनमध्ये कर्व्ह्ड डिस्प्ले आहे, जे प्रीमियम क्लास फोनचे वैशिष्ट्य आहे. हा फोन इतर स्मार्टफोनपेक्षा अनेक प्रकारे खास आहे. मात्र, त्याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी 5 जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागेल.

जुन्या लीकनुसार, Vivo V23 Pro मध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा असेल, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल असेल, जो ऑटोफोकससह येतो. हा फोन र्व्ह्ड डिस्प्ले आणि S स्लिम बॉडी असलेला फोन आहे.

5 जानेवारीला होणार लॉन्च

Vivo V23च्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, यामध्ये प्रायमरी सेन्सर 64 मेगापिक्सेल असेल. हा 5G मोबाइल असेल. हा फोन भारतात 5 जानेवारीला दुपारी 12 वाजता लॉन्च होईल. या सिरीज अंतर्गत दोन स्मार्टफोन नॉक करू शकतात, ज्यांची नावं Vivo V23, Vivo V23 Pro असतील. तसंच त्याला कर्व्ह्ड एज असतील.

मेटल फ्रेम

यामध्ये मेटल फ्रेम वापरण्यात येणार असल्याचं टीझर व्हिडिओमध्ये दिसून आलंय. दोन्ही मॉडेल्समध्ये गोल्ड कलर व्हेरिएंटदेखील दिसेल. जुन्या रिपोर्ट्सनुसार, या फोन्समध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरे उपलब्ध असतील.

इतर बातम्या

Vodafone Idea चे Disney+ Hotstar बेनिफिटवाले प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद, जाणून घ्या डिटेल्स

सर्वात जलद चार्ज होणाऱ्या Xiaomi 11i HyperCharge ची लाँच डेट जाहीर, किंमत…

फ्लॅगशिप प्रोसेसर, 60MP कॅमेरासह Moto चा शानदार स्मार्टफोन भारतात लाँचिंगसाठी सज्ज

(Vivo V23 series to be launched January 5 with color-changing back panels on)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.