Vivo V40 5G स्मार्टफोनवर 7 हजारांची सूट, 50MP सेल्फी कॅमेऱ्यासह दमदार फीचर्स
Vivo V40 5G: तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण, आम्ही तुमच्यासाठी आज एक चांगला पर्याय आणला आहे. नुकताच Vivo V40 5G लॉन्च झाला आहे. Vivo V40 5G या स्मार्टफोनची किंमत अत्यंत कमी आहे. म्हणजे तुमच्या बजेटवाला स्मार्टफोन आहे, असंही म्हणता येईल. विशेष म्हणजे यावर तुम्हाला 7 हजारांची सूट मिळू शकते. फीचर्स आणि किंमत जाणून घ्या.
स्मार्टफोन घ्यायचा म्हणलं की बजेटवाला, दमदार फीचर्स असणारा आणि ब्रँडेड हवा, अशी अगदी सर्वांचीच मागणी असते. यात काही गैर देखील नाही. आज आम्ही तुम्हाला या तिन्ही गोष्टींची पूर्तता करणारा एक चांगला स्मार्टफोन पर्याय घेऊन आलो आहोत. तुमच्या बजेटवाला Vivo V40 5G नुकताच लॉन्च झाला आहे. याविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या.
Vivo V40 5G ची कॅमेरा क्वॉलिटी कशी?
Vivo V40 5G नुकताच लॉन्च झाला आहे. तुम्ही चांगला कॅमेरा क्वॉलिटी असलेला स्मार्टफोन शोधात असाल तर तुम्ही Vivo V40 5G स्मार्टफोन खरेदी करावा कारण सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
अॅमेझॉनवरून 7000 ची सूट
Vivo V40 5G यासोबतच याच्या बॅक पॅनेलवर 50 मेगापिक्सलची ड्युअल कॅमेरा सिस्टिमही मिळेल. अॅमेझॉनवरून खरेदी केल्यास तुम्हाला 7000 ची सूट मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया यात मिळणाऱ्या सर्व ऑफर्सबद्दल.
Vivo V40 5G चा HD+ AMOLED डिस्प्ले
Vivo V40 5G चा डिस्प्ले: Vivo V40 5G स्मार्टफोनमध्ये 4500 नीड्स बिग ब्राइटनेससह 6.78 इंचाचा फुल Full HD+ AMOLED डिस्प्ले आहे. हा 2800×1260 पिक्सर रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो.
Vivo V40 5G चे प्रोसेसर: विवो कंपनीने अँड्रॉइड V14 ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित असलेल्या या 5G स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला आहे.
Vivo V40 5G ची रॅम आणि स्टोरेज: याच्या रॅम आणि स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला 8GB रॅमसोबत 128GB इंटरनल स्टोरेज मिळणार आहे.
Vivo V40 5G चा प्रायमरी कॅमेरा: कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर याच्या बॅक पॅनेलवर ड्युअल कॅमेरा सेटअप असणार आहे. यात 50 मेगापिक्सलचा वाईड अँगल प्रायमरी कॅमेरा आहे.
50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेराही उपलब्ध आहे. तर कंपनीने आपल्या बॅक पॅनेलवर Smart Aura Light देखील दिला आहे.
Vivo V40 5G चा सेल्फी कॅमेरा: याच्या सेल्फी कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला असून त्यामध्ये अतिशय चांगल्या कॅमेऱ्याची गुणवत्ता आहे.
Vivo V40 5G ची बॅटरी: 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह यात 5500 एमएएच लिथियम-आयन बॅटरीचा सपोर्ट मिळणार आहे.
Vivo V40 5G चे इतर फीचर: Vivo V40 5G स्मार्टफोनला धूळ आणि पाण्यापासून वाचवण्यासाठी याला वॉटरप्रूफ आयपी 68 आणि आयपी 69 चा सपोर्ट देण्यात आला आहे.
Vivo V40 5G वर डिस्काउंट ऑफर्स किती?
Vivo V40 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात 40 हजार रुपयांना विकला जात आहे. पण, सध्या (ई-कॉमर्स वेबसाइट) हा 8GB रॅमचा स्मार्टफोन अॅमेझॉनवरून खरेदी केला जात आहे. तर अॅमेझॉन फक्त 32 हजार 999 रुपयांत 7 हजार रुपयांची सूट देते.
दरमहा 1600 रुपये नो कॉस्ट EMI
तुम्ही EMI प्लॅनच्या माध्यमातून खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला दरमहा 1600 रुपये नो कॉस्ट EMI जमा करावा लागेल. तुम्हाला हा 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल आणि एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट करायचा असेल तर तुम्हाला 1750 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळतो.