दिवसाला 45 रुपये भरा; करा खरेदी स्मार्टफोन 5G, या कंपनीची धमाल ऑफर
Slimmest 3D Curved Display 5G Phone : तुम्ही दिवसाकाठी 100 रुपये कमाई करत असाल आणि 45 रुपये ईएमआय भरण्याची तयारी असेल तर या कंपनीचा 5G मोबाईल तुम्ही खरेदी करु शकणार आहात. या कंपनीने एक जबरदस्त ऑफर आणली आहे. कसा होईल फायदा?
बाजारात आठवड्याला, महिन्याला नवनवीन फीचरसह स्मार्टफोन बाजारात दाखल होतात. आज सोशल मीडिया, रील्सचा जमाना आहे. अगदी गावखेड्यातील, पाड्यावरील पण अनेक जण इन्स्टाग्राम, युट्यूब, फेसबूक आणि इतर सोशल मीडियावरील रील्सकार झाले आहेत. अनेकांना अजूनही परिस्थितीशी झगडावे लागते. त्यांच्याकडे स्मार्टफोन घेण्यास एकदम मोठी रक्कम नसते. अशांसाठी विवो कंपनीने एक खास ऑफर आणली आहे.
Vivo Y200 Pro 5G बाजारात
विवोचा नवीन स्मार्टफोन Vivo Y200 Pro 5G बाजारात दाखल झाला आहे. हा 3D कर्व्ह्ड डिस्प्ले असणारा सर्वात बारीक, स्लीम स्मार्टफोन असल्याचा कंपनीचा दावा आहे. या स्मार्टफोनमध्ये 64 MP OIS एंटी-शेक कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने हा फोन खरेदी करण्यासाठी खास ऑफर आणली आहे.
हे सुद्धा वाचा
काय आहे ऑफर
- Vivo Y200 Pro 5G स्मार्टफोन दोन रंगात उपलब्ध आहे. ऑप्शन सिल्क ग्रीन आणि सिल्क ब्लॅक या दोन रंगात हा स्मार्टफोन मिळतो. यामध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळते. त्याची किंमत 24,999 रुपये आहे. या स्मार्टफोनची आजपासून ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर विक्री सुरु झाली आहे.
- फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन खरेदी करताना ग्राहकांना काही ऑफर्सचा फायदा पण मिळतो. एसबीआय बँक, क्रेडिट, डेबिटचा वापर करुन फोन खरेदी केल्यास 2500 रुपयांचे त्वरीत कॅशबॅक मिळते. तर कंपनीने अजून एक भन्नाट ऑफर आणली आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन रोज 45 रुपये ईएमआयवर खरेदी करता येईल.
काय आहेत वैशिष्ट्ये
- या स्मार्टफोन, ग्राहकाला 2.3mm नॅरो फ्रेम आणि अल्ट्रा स्लिम बॉडीमध्ये मिळेल.
- विवोचा हा स्मार्टफोन 6.8 इंच कर्व्ह्ड एमोलेड डिस्प्लेमध्ये मिळेल.
- फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट मिळतो. या फोनचे वजन 172 ग्रॅम आहे.
- फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
- या फोनचा मुख्य कॅमेरा 64MP आहे. तो एंटी शेक नाईट पोर्टेट मोडसह येतो.
- हा स्मार्टफोन क्वालिटी इमेज कॅप्चर करण्यास सक्षम आहे.
- हा फोन सुपर नाईट मोडसह येतो. Snapdragon 695 5G चिपसेट
- Vivo Y200 Pro 5G मध्ये 5000mAh ची बॅटरी मिळते.
- बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते
- हा स्मार्टफोन 14 बेस्ड Funtouch OS सपोर्टसह बाजारात उपलब्ध