Vivo Y73 2021 भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या मिड-रेंज स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स

Vivo कंपनी भारतात Y सीरीजअंतर्गत नवीन मिड-रेंज स्मार्टफोन लाँच करु शकते. आगामी स्मार्टफोन Vivo Y73 2021 या महिन्यात भारतात लाँच होईल

Vivo Y73 2021 भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या मिड-रेंज स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स
Vivo Y73 2021
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 11:45 PM

मुंबई : व्हिवो (Vivo) कंपनी भारतात Y सीरीजअंतर्गत नवीन मिड-रेंज स्मार्टफोन लाँच करु शकते. कंपनीचा आगामी स्मार्टफोन Vivo Y73 2021 या महिन्यात भारतात लाँच होईल. या फोनच्या स्पेक्सबद्दल काही माहिती लीक झाली आहे. यामध्ये मिडियाटेक हेलियो G95 SoC अंडर द हुड प्रोसेसर दिला जाईल. तसेच हा फोन एमोलेड डिस्प्लेसह सादर केला जाईल. हा स्मार्टफोन 64 मेगापिक्सल रियर कॅमेरा सेटअपसह लाँच केला जाईल. (Vivo Y73 2021 ready to lanch in India, specifications leaked)

फोनमध्ये 6.44 इंचाचा FHD+ एमोलेड डिस्प्ले असेल जो 2400 × 1080 पिक्सल रिझोल्यूशनसह येईल. यात तुम्हाला एचडीआर 10 सपोर्टही मिळेल. डिस्प्लेमध्ये एक ऑप्टिकल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल जो वॉटरड्रॉप नॉचसह येईल. यात ऑक्टा कोअर मीडियाटेक हेलिओ G95 SoC प्रोसेसर देण्यात येईल. असाच प्रोसेसर रेडमी नोट 10 एस, रियलमी 8, रियलमी नर्झो 30 4G आणि इन्फिनिक्स 10 प्रो मध्ये वापरला गेला आहे.

फोनमध्ये Mali-G75 GPU देण्यात येईल. हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येतो. फोनमध्ये 3 जीबी एक्स्टेंडेड रॅम देण्यात येईल. हँडसेटमध्ये मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देखील देण्यात येईल. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड फनटच ओएस 11 वर चालेल.

कॅमेरा फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा रीअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जो एलईडी फ्लॅशसह येईल. Vivo स्मार्टफोन प्रमाणेच यामध्ये कॅमेरा मॉड्यूल दिला जाईल. फोनचा प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सेलसह येईल. त्याच वेळी, यात 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि फ्रंटला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल.

बॅटरी आणि इतर फिचर्स

फोनमध्ये 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात येईल जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात येईल. फोनमध्ये 4 जी, ड्युअल सिम, 2.4 / 5GHz वायफाय, ब्लूटूथ 5.0 असेल.

इतर बातम्या

दमदार प्रोसेसर आणि डिस्प्लेसह Realme X7 Max 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

लाँचिंगपूर्वीच Samsung Galaxy Tab S8 ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या काय असेल खास?

OnePlus चा किफायतशीर स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Vivo Y73 2021 ready to lanch in India, specifications leaked)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.