आठ हजार रूपयांनी स्वस्त झाला विवोचा हा तगडा स्मार्टफोन, 8 जीबी रॅम, 6,000 mAh बॅटरी
Vivo च्या या फोनमध्ये Android OS हा फोन उपलब्ध आहे, जो Origin OS सह येतो. HyperEngine 3.0 तंत्रज्ञानाला सपोर्ट करणारा MediaTek Dimensity 1300 चिपसेट या Vivo फोनमध्ये प्रोसेसर म्हणून उपलब्ध आहे.
मुंबई : सध्याच्या काळातही ई-कॉमर्स कंपनी फोन, इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजसारख्या वस्तू स्वस्तात उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांचा कल ऑनलाई बाजाराकडे जास्त आहे. फ्लिपकार्टवर ग्राहकांना एकापेक्षा एक ऑफर देण्यात येत आहेत. स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाल्यास ग्राहक विवो स्मार्टफोन (Vivo T2x) अतिशय स्वस्तात खरेदी करण्याची संधी मित आहे. फ्लिपकार्ट पेजवरून मिळालेल्या माहितीनुसार, 8GB रॅम असलेला Vivo T2x 20,999 रुपयांऐवजी केवळ 12,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. म्हणजेच यावर आठ हजार रुपयांची बचत होऊ शकते. फोनची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा सुपर नाईट मोड, उत्कृष्ट कॅमेरा सेटअप आणि 7nm 5G प्रोसेसर.
काय आहे ऑफर?
फ्लिपकार्टवर दिलेल्या माहितीनुसार, हा Vivo फोन 20,999 रुपयांऐवजी फक्त 12,999 रुपयांमध्ये घरी आणला जाऊ शकतो. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo T2x मध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.59-इंचाचा FHD+ IPS LCD डिस्प्ले आहे. फोनचा डिस्प्ले 650 nits पीक ब्राइटनेससह येतो.
वैशिष्ट्ये
Vivo च्या या फोनमध्ये Android OS हा फोन उपलब्ध आहे, जो Origin OS सह येतो. HyperEngine 3.0 तंत्रज्ञानाला सपोर्ट करणारा MediaTek Dimensity 1300 चिपसेट या Vivo फोनमध्ये प्रोसेसर म्हणून उपलब्ध आहे. हा फोन 8 GB LPDDR4x रॅम आणि 256 GB स्टोरेज सह सादर करण्यात आला आहे. कॅमेरा म्हणून, या फोनमध्ये f/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स शूटर आहे, जो f/2.4 अपर्चरसह येतो. सेल्फीसाठी या फोनच्या फ्रंटमध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
पॉवर सपोर्ट म्हणून या फोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 44W फास्ट चार्जिंगसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी, Vivo T2x मध्ये 4G LTE, Wi-Fi आणि ड्युअल सिम सपोर्ट आहे.