Voice Message Transcription: WhatsApp वर आलेल्या व्हॉईस मेसेज ऐकण्याचा कंटाळा आला आहे का? मग त्यावर आता नवीन आलेला पर्यायही जाणून घ्या. आता तुम्हाला पूर्वीसारखं WhatsApp वर आलेला व्हॉईस मेसेज ऐकण्याची गरज नाही. हो सत्य आहे. आता तुम्ही व्हाईस मेसेज वाचूही शकतात. या नव्या फीचरविषयी जाणून घ्या.
WhatsApp ने एक नवीन फीचर लॉन्च केले आहे. WhatsApp च्या नव्या फीचरमुळे व्हॉईस मेसेज वाचणे आणखी सोपे झाले आहे. WhatsApp ने आपल्या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून या फीचरची माहिती दिली आहे. कंपनीच्या ब्लॉग पोस्टनुसार याला व्हॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्ट फीचर असे नाव देण्यात आले आहे.
WhatsApp चे नवे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही युजर्ससाठी रोलआउट करण्यात आले आहे. WhatsApp चे हे नवे फीचर त्या लोकांसाठी खास आहे ज्यांना व्हॉईस मेसेज ओपन करायचे नाहीत. युजर्स WhatsApp च्या या फीचरच्या माध्यमातून येणाऱ्या व्हॉईस मेसेजेसचे ट्रान्सक्रिप्ट वाचू शकतात. हे ट्रान्सक्रिप्ट फक्त व्हॉईस मेसेज रिसिव्ह करणाऱ्या युजर्सना दिसेल. WhatsApp च्या एंड-टू-एंड एन्क्रिप्शनमुळे व्हॉईस मेसेज अजूनही सुरक्षित आहेत, असे कंपनीने म्हटले आहे.
आधी तुम्हाला WhatsApp ओपन करावं लागेल.
त्यानंतर तुम्हाला WhatsApp सेटिंगमध्ये जावे लागेल.
त्यानंतर चॅटवर टॅप करा.
येथे तुम्हाला व्हॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्टवर क्लिक करून ऑन करावे लागेल.
त्यानंतर तुम्ही कोणत्याही युजरच्या चॅटवर जाऊन व्हॉईस मेसेज लाँग प्रेस करा
त्यानंतर ट्रान्सक्रिप्टवर टॅप करा आणि व्हॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्ट होईल.
हे फीचर इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, इटालियन, जपानी अशा अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. अँड्रॉइड युजर्ससाठी हे सध्या इंग्रजी, स्पॅनिश, पोर्तुगीज (ब्राझील), रशियन आणि हिंदीपुरते मर्यादित आहे.
तुम्हाला “ड्राफ्ट” लेबल हे माहिती आहे का, आम्ही याविषयी माहिती तुम्हाला खाली सविस्तर देत आहोत. जाणून घ्या.
जेव्हा आपण मेसेज टाईप करण्यास सुरवात करता परंतु “सेंड” दाबत नाही, तेव्हा WhatsApp आता चॅटला स्पष्ट “ड्राफ्ट” लेबलसह लावणार आहे. आपल्या चॅट लिस्टच्या वर हा ड्राफ्ट दिसेल. यामुळे अनेक चॅट स्क्रोल न करता तुम्ही तुमचे मेसेज त्वरीत शोधू शकता आणि पूर्ण करू शकता, असे कंपनीने म्हटले आहे.