WhatsApp | घाबरू नका, तुमचे खाजगी मेसेज सुरक्षित! व्हॉट्सअ‍ॅपचा वापरकर्त्यांना दिलासा

व्हॉट्सअ‍ॅपवर तुमचे खासगी संदेश दिसत नाहीत आणि तुमचे कॉल ऐकले जात नाहीत. तसेच कोणत्याही वापरकर्त्याच्या मेसेज किंवा कॉलिंगमध्ये लॉगइन केले जात नाही.

WhatsApp | घाबरू नका, तुमचे खाजगी मेसेज सुरक्षित! व्हॉट्सअ‍ॅपचा वापरकर्त्यांना दिलासा
Follow us
| Updated on: Jan 12, 2021 | 6:55 PM

मुंबई : तुम्ही बर्‍याच काळापासून व्हॉट्सअ‍ॅप प्लॅटफॉर्म वापरत आहात? व्हॉट्सअ‍ॅप किती सुरक्षित आहे याबद्दल तुमची चिंता वाढली असेल, तर तुमच्यासाठी एक दिलादायकची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अफवांवर आता लक्ष देण्याची गरज नाही, असे व्हॉट्सअ‍ॅपने ट्विट केले आहे. यात व्हॉट्सअ‍ॅपने वापरकर्त्यांचे खाजगी संदेश पूर्णपणे सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. व्हॉट्सअ‍ॅप एंड-टू-एंड एन्क्रिप्शनवर कार्य करते (WhatsApp Clarifies their new privacy policy).

व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की, ‘व्हॉट्सअ‍ॅपवर तुमचे खासगी संदेश दिसत नाहीत आणि तुमचे कॉल ऐकले जात नाहीत. तसेच कोणत्याही वापरकर्त्याच्या मेसेज किंवा कॉलिंगमध्ये लॉगइन केले जात नाही. तसेच, व्हॉट्सअ‍ॅप तुमचे शेअर लोकेशनदेखील पाहत नाही, तसेच फेसबुकही ते पाहू शकत नाही. त्याचबरोबर व्हॉट्सअ‍ॅप फेसबुकवर तुमचे कोणतेही संपर्क शेअर करणार नाही. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप हा नेहमीच खासगी ग्रुप असेल. डीसअपिअर पर्याय वापरून आपण ठराविक वेळेत आपले मेसेज हटवू शकता. तसेच, केवळ वापरकर्ताच त्याचा डेटा डाऊनलोड करण्यासाठी सक्षम असेल.’

व्हॉट्सअ‍ॅपने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, तुम्ही शेअर केलेले लोकेशन्स प्रायव्हेट असतात. तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट आमच्या सर्व्हरमध्ये अपलोड केलेली असते परंतु आम्ही ती कधीही फेसबुकसोबत शेअर करत नाही. क्रॉस मेसेजिंग प्लॅटफॉर्म आणि व्हॉईस ओव्हर आयपी सर्व्हिस प्रोव्हायडर असलेल्या या कंपनीने पुन्हा एकदा नव्या गोपनियता धोरणाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. यापूर्वीदेखील कंपनीने याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं, त्यात त्यांनी म्हटलं होतं की, नव्या गोपनीयता धोरणाचा केवळ बिझनेस अकाऊंट्सवर परिणाम होईल.

व्हॉट्सअ‍ॅपकडून स्पष्टीकरण

काही दिवसापूर्वी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील मेसेज गुगलवर दिसत होते. गुगलवर एखाद्या व्यक्तीनं WhatsApp Group सर्च केल्यास चॅटिंग वाचता येत होते. तसेच त्या लिंकवरुन वैयक्तिक ग्रुपदेखील जॉईन करता येत होते. व्हॉट्सअ‍ॅपच्या चुकीमुळे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील नंबर सार्वजनिक झाले होते. मागील वर्षी देखील व्हॉट्सअ‍ॅप मेसेज गुगलवर दिसत होते. व्हॉट्सअ‍ॅपकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले होते (WhatsApp Clarifies their new privacy policy).

डाटा, मेसेज आणि ग्रुप इनवाईट लिंक गुगलसर्च आल्याविषयी व्हॉट्सअ‍ॅपनं भूमिका स्पष्ट केली होती. मार्च 2020 नंतर व्हॉट्सअ‍ॅपशी संबंधित लिंक असणाऱ्या पेजेसला no index टॅग लागू केला असल्याचं सांगितले होते. व्हॉट्सअ‍ॅपकडून दरवेळी डाटा लीकवर स्पष्टीकरण देण्यात येते. मात्र, सद्याच्या नव्या गोपनीयता धोरणामुळे व्हॉट्सअ‍ॅपचे वापकर्ते सिग्नल आणि टेलीग्रामवर शिफ्ट होत असल्याचं चित्र दिसत आहे.

माहिती लीक होण्याची ही पहिली वेळ नाही!

व्हॉट्सअ‍ॅप चॅट गुगलवर लीक होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी 2019मध्ये गुगल सर्चमध्ये बर्‍याच ग्रुप्स आणि वैयक्तिक चॅट्सही सापडल्या होत्या. व्हॉट्सअ‍ॅपने आता हा बग दुरुस्त केला आहे. अहवालानुसार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे सुमारे 1500 इन्व्हाईट लिंक गुगलच्या सर्चमध्ये येत होत्या. व्हॉट्सअ‍ॅपमधील या त्रुटीविषयी राजशेखर राजहरियांनी याबाबत माहिती दिली होती.

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या अटी-शर्थी

दरम्यान, नुकतंच WhatsApp च्या नवीन अटी आणि शर्ती आणल्या आहेत. त्या अटी 8 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. नवीन धोरणात फेसबुक आणि इंस्टाग्रामचे इंटिग्रेशन आहे. आता युजर्सचा आधीच्या तुलनेत जास्त डेटा फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबत शेअर केला जाईल. व्हॉट्सअ‍ॅपवरील डेटा आधीच फेसबुक सोबत शेयर केला जात होता. परंतु, कंपनीने आता स्पष्ट केले आहे की, फेसबुक सोबत व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामचे इंटिग्रेशन जास्त राहील. असं म्हटलं जातंय की, जवळपास आपली WhatsApp सर्वच माहिती फेसबुक आणि इंस्टाग्रामसोबत शेअर केली जाईल.

(WhatsApp Clarifies their new privacy policy)

हेही वाचा :

WhatsApp, Signal की Telegram, कोणतं अ‍ॅप आहे बेस्ट आणि सुरक्षित?

व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस ग्रुप लिंक Goggle Search वर लीक, WhatsApp कडून भूमिका जाहीर

तुमचा WhatsApp वरील डेटा अन्य प्लॅटफॉर्म्सवर शेअर होणार, संमती न दिल्यास अकाऊंट बंद केलं जाईल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.