WhatsApp Edit : चुकीची करा दुरुस्ती, व्हॉट्सॲपचं नवीन फिचर लय भारी!

WhatsApp Edit : व्हॉट्सॲपमध्ये आता तुमची चूक लागलीच दुरुस्ती करता येणार आहे. मॅसेज एडिट करण्याचा पर्याय देण्यात आला आहे, काय आहे हे फिचर...

WhatsApp Edit : चुकीची करा दुरुस्ती, व्हॉट्सॲपचं नवीन फिचर लय भारी!
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 7:02 PM

नवी दिल्ली : WhatsApp ने चुकीला माफी देण्याची युक्ती वापरकर्त्यांच्या हातात दिली आहे. बऱ्याचदा घाईगडबडीत मॅसेज करताना अथवा नजरचुकीने मॅसेज करताना चूक होते आणि मग आपली धांदल उडते. तो मॅसेज डिलेट करण्याची कोण धांदल उडते. पण बहुप्रतिक्षेत असलेले फिचर एकदाचे WhatsApp ने लॉन्च केले आहे. हे फिचर त्या वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाचे आहे, जे चुकीचे मॅसेज पाठविण्यात एक्स्पर्ट असतात. अथवा एखाद्यावेळी अजाणतेपणाने चुकीचा संदेश पाठविल्या जातो. तर आता WhatsApp Edit फीचरच्या मदतीने चूक दुरुस्त करता येणार आहे.

काय आहे अट WhatsApp ने एडिट फीचर वापरकर्त्यांच्या हातात दिले असले तरी त्याला एक अट पण घातली आहे. जर एखाद्याला त्याने पाठविलेला मॅसेज चुकीचा आहे असे वाटल्यास त्याला 15 मिनिटांच्या आत या फिचरचा वापर करावा लागेल. म्हणजे पंधरा मिनिटांच्या आत त्याला मॅसेज एडिट करावा लागेल. त्यानंतर हा मॅसेज एडिट करता येणार नाही. पण तो मॅसेज डिलिट करण्याचा वापरकर्त्यांचा सुरक्षित ठेवण्यात आला आहे. त्यांना मॅसेज डिलिट करता येईल.

अनेक बदलांची नांदी सध्या अनेक बदलांची नांदी येऊ घातली आहे. एडिट ऑप्शनशिवाय वापरकर्त्यांना इतर पण अनेक फिचर मिळतील. व्हॉट्सअप एडिट फिचर क्रमाक्रमाने येत्या काही दिवसांत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. WhatsApp च्या मॅसेजमध्ये चुकीचे स्पेलिंग सुधारता येईल. तसेच एखादा नवीन शब्द, पर्यायी शब्द जोडता येईल. याविषयीच्या सेवेची चाचपणी सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

कसा कराल वापर

  1. यासाठी सर्वात अगोदर चॅट ओपन करावी लागेल. त्यानंतर जो शब्द अथवा वाक्य एडिट करायचे ते निवडा
  2. या मॅसेजवर लाँग प्रेस करावे लागेल. त्यानंतर लागलीच तुम्हाला एडिटचा पर्याय समोर दिसेल
  3. या एडिट पर्यायावर क्लिक करुन तुम्ही पहिल्या वाक्यातील चूक दुरुस्त करु शकाल
  4. हा पर्याय केवळ 15 मिनिटांसाठी असेल. तोपर्यंतच तुम्हाला मॅसेजमध्ये एडिट करता येईल
  5. त्यानंतर वापरकर्त्यांना डिलिट या पर्यायाचा वापर करावा लागेल

हे ठेवा लक्षात तुम्ही जेव्हा मॅसेज एडिट करत असाल तेव्हा, त्याला लेबल केलं जाईल. मॅसेज प्राप्तकर्त्याला हे दिसेल की, तुम्ही संबंधित मॅसेड एडिट करत आहेत ते. पण तुम्ही काय बदलाव करत आहात, हे त्याला तेव्हाच दिसणार नाही. त्यासाठी त्याला वाट पहावी लागेल. मेटा कंपनीने फेसबुकला 10 वर्षांपूर्वीच एडिट फीचर दिले होते. पण व्हॉट्सॲपमध्ये आता ही सुविधा मिळणार आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.