AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp Golden Logo : व्हाट्सअॅपच्या हिरव्या रंगाचा कंटाळा आलाय? ट्राय करा सोनेरी रंग, पाहा स्टेप्स…

WhatsApp लॉन्च झाल्यापासून ते फक्त हिरव्या रंगाच्या थीमवर काम करतं. अशा स्थितीत त्याच्या त्याच रंगाचा अनेकांना कंटाळा आलाय. मात्र आता तुम्हाला हवं असल्यास व्हाट्सअॅप लोगोचा रंग बदलू शकता.

WhatsApp Golden Logo : व्हाट्सअॅपच्या हिरव्या रंगाचा कंटाळा आलाय? ट्राय करा सोनेरी रंग, पाहा स्टेप्स...
WhatsApp
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 4:59 PM

मुंबई : ख्रिसमस (Christmas) 2021तर संपला आता नवीन वर्ष 2022 (New Year 2022) येणार आहे. आपण सर्वजण नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी घराची सजावट करून आनंद साजरा करण्यासाठी उत्सुक आहोत. या निमित्तानं व्हाट्सअॅपही वेगळ्या पद्धतीनं आपण सजवू शकतो. WhatsApp लॉन्च झाल्यापासून ते फक्त हिरव्या रंगाच्या थीमवर काम करतं. अशा स्थितीत त्याच्या त्याच रंगाचा अनेकांना कंटाळा आलाय. मात्र आता तुम्हाला हवं असल्यास व्हाट्सअॅप लोगोचा रंग बदलू शकता.

WhatsApp लोगो हा हिरव्या रंगाचा आहे. तुम्ही तो चमकदार सोनेरी रंगाच्या चिन्हात बदलू शकता. पण, व्हॉट्सअॅपमध्ये हे करण्यासाठी कोणताही पर्याय किंवा फीचर देण्यात आलेलं नाही. युझर थर्ड पार्टी अॅप वापरून हिरव्या रंगाचा आयकॉन गोल्डमध्ये बदलू शकतात. त्याच्या स्टेप्स आपण पाहू या.

व्हॉट्सअॅप आयकॉन गोल्डन कलरमध्ये कसं बदलावं? 1: तुम्हाला प्रथम तुमच्या स्मार्टफोनवर नोव्हा लॉन्चर डाउनलोड करणं आवश्यक आहे. 2: तुमच्या स्मार्टफोनवर नोव्हा लॉन्चर आल्यावर, अॅप उघडा आणि नंतर तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर तुमची पसंतीची स्टाइल निवडा. 3: त्यानंतर तुम्हाला गोल्डन WhatsAppलोगो शोधावा लागेल. 4: यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त जे आवडेल ते डाउनलोड करण्याचा पर्याय आहे. 5: आता तुम्हाला फक्त दोन सेकंदांसाठी व्हॉट्सअॅप आयकॉनवर टॅप करायचंय. यानंतर तुमच्या स्मार्टफोनवरचा WhatsApp लोगो गोल्डन कलरमध्ये बदलेल. 6: त्यानंतर स्क्रीन विंडोवर एक एडिट पेन्सिल दिसेल. त्यावर टॅप करा आणि तुम्ही आता डाउनलोड केलेली सोनेरी WhatsApp लोगो इमेज निवडण्यासाठी तुमच्या फोटो गॅलरीमध्ये जा. 7: त्यानंतर Doneवर क्लिक करा आणि नवीन वर्ष 2022चं स्वागत करण्यासाठी इथं तुमचा WhatsApp लोगो गोल्डन WhatsApp लोगोमध्ये बदलेल. 8: परंतु तुम्हाला हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे, की तुम्ही डाउनलोड केलेला WhatsApp आयकॉन पारदर्शक (Transparent) PNG फॉरमॅटमध्ये असले पाहिजे, अन्यथा, तो WhatsApp गोल्डन लोगो म्हणून सेट केला जाणार नाही.

व्हाट्सअॅपच्या सूचना व्हॉट्सअॅपच्या मते, थर्ड पार्टी अॅप्स युझर्सच्या सुरक्षेशी तडजोड करतात. युझर्सची माहितीही हॅक करू शकतात. हे इतर वेबसाइटवरून साइड-लोड केलेले असतात. युझर्सच्या डिव्हाइसला ते संक्रमित करू शकतात.

Smartphones : रंग बदलणारा मोबाइल पाहिलाय? वाचा, कधी येणार आणि काय फिचर्स आहेत

WhatsApp प्रोफाइल ठराविक लोकांपासून कशी लपवणार? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Airtel Vs JioFiber Vs BSNL: 50Mbps स्पीडसह 500 रुपयांपेक्षा स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन, जाणून घ्या बेस्ट ऑप्शन्स

बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी.
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार.
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश.
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल.
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू.