Whatsapp new features : ‘व्हॉट्सअॅप’ चे नवीन फीचर्स.. ग्रुपव्हॉईस कॉलमध्ये आता, 32 लोकांना होता येईल सहभागी
इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने गुरुवारी सांगितले की ते 32 लोकांशी ग्रुप व्हॉईस कॉलमध्ये कनेक्ट करण्याची आणि 2 गीगाबाइट आकाराच्या फायली शेअर करण्याच्या सुविधेसह आणखी काही वैशिष्ट्ये व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच जोडणार आहेत.
मुंबई : व्हॉट्सअॅपने (WhatsApp) गुरुवारी सांगितले की कंपनीने, त्याचे काही फीचर्स अपडेट केले असून, आता व्हॉट्सअॅप, 32 लोकांना ग्रुप व्हॉईस कॉलमध्ये एकत्र सामील होण्याची आणि दोन गीगाबाइट्सपर्यंतच्या फाइल्स शेअर करण्याची परवानगी देईल. व्हॉट्सअॅप ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की इतर अॅप्स शेकडो हजारो युजर्ससाठी चॅट तयार करत असताना, ते दैनंदिन जीवनाचा महत्वाचा भाग असलेल्या ग्रुप्सला एकत्रित आणण्यासाठी वाट्अप लक्ष केंद्रित करीत आहे. आणल्या जाणार्या नवीन वैशिष्ट्यांपैकी, व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्याचा पर्याय (Options) प्रदान करेल ज्या अंतर्गत शाळा, निवासी सोसायटी, विविध ठिकाणी मित्र यासारख्या ग्रुपचे प्रतिनिधित्व करणारे सर्व ग्रुप व्हाट्अपवर तयार केले जाऊ शकतात. याशिवाय व्हॉट्सअॅपने आणखी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्याची चर्चा आहे. सध्या, मोबाईल अॅपचा वापर करून ग्रुप व्हॉईस कॉलमध्ये फक्त आठ लोक जोडले जाऊ शकतात आणि युजर्समध्ये एक जीबीपेक्षा मोठ्या आकाराची (larger file sharing) फाईल शेअर करता येत नाही.
कंपनीच्या प्रवक्त्याचे विधान
WhatsApp चॅट ग्रुपच्या अॅडमिनला कधीही मेसेज डिलीट करण्याची परवानगी देईल. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, काढून टाकलेली सामग्री ग्रुपच्या कोणत्याही सदस्यांना दिसणार नाही. मेटा प्लॅटफॉर्मचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘आम्ही व्हॉट्सअॅपवरील ग्रुप्समध्ये फीडबॅक, मोठ्या फाइल शेअरिंग आणि मोठ्या ग्रुप कॉल्ससह नवीन फीचर्स देखील जोडत आहोत.’
नवनवीन कल्पनांचे समर्थन
आजच्या काळात, जेव्हा प्रत्येकजण कोणत्याही अॅपमध्ये नवीन वैशिष्ट्ये शोधत असतो, तेव्हा कोणत्याही अॅपसाठी ते सतत काहीतरी नवीन करत राहणे खूप महत्वाचे आहे. कोणत्याही प्लॅटफॉर्मसाठी, वापरकर्त्यांची मने जिंकण्यासाठी नावीन्यपूर्ण काम करत राहणे आवश्यक असल्याने, व्हॉट्सअॅप ही नवनवीन कल्पनांचे समर्थन करीत असल्याचे म्हटले आहे.
इतर बातम्या
Health Tips : हलासन करा, मणक्याच्या आणि पाठीच्या दुखण्यापासून कायमचा आराम मिळवा!