WhatsApp लवकरच अपडेट होणार, यूजर्सला मिळणार ‘हे’ सहा अनोखे फीचर्स

येत्या काही दिवसात ते अपडेट लाँच करण्यात येणार आहे. (WhatsApp Update 6 New Features)

WhatsApp लवकरच अपडेट होणार, यूजर्सला मिळणार 'हे' सहा अनोखे फीचर्स
Follow us
| Updated on: Jan 04, 2021 | 9:56 PM

मुंबई : व्हॉट्सॲप हे जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय ॲप म्हणून ओळखलं जाते. व्हॉट्सॲप हे आपल्या युजर्सला दररोज नवनवे अपडेट देत असतात. व्हॉटसॲप गेल्या काही दिवसांपासून नवनव्या फिचर्सवर काम करत आहे. येत्या काही दिवसात ते अपडेट लाँच करण्यात येणार आहे. (WhatsApp Update 6 New Features)

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सॲप वेब आणि डेस्कटॉपवर Voice आणि Video कॉल्सचे टेस्ट करता येणार आहे. या काही फिचर्सशिवाय कंपनीकडून अजूनही काही नवनवे फिचर्स अपडेट करणार आहे.

व्हॉटसॲप मल्टी डिवाईस सपोर्ट

या फिचर्समध्ये युजर्स एकापेक्षा अनेक डिवाईसवरुन लॉगिन करता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनी यावर काम करत आहे. नुकतंच WhatsApp आणि iOS बीटा वर्जनमध्ये याचे ट्रायल सुरु आहेत. यामुळे एकावेळी दोन डिवाईसमध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार आहे.

व्हॉट्सॲप वेब आणि डेस्कटॉप ॲपवरुन कॉलिंगची सुविधा

अनेक युजर्स या फिचर्सची गेल्या काही दिवसांपासून वाट बघत आहेत. त्यामुळे लवकरचे व्हॉट्सअॅप वेब, डेस्कटॉप आणि macOS द्वारे Voice/ Video कॉल्स करता येणार आहे. हे फिचर डेस्कटॉपद्वारे पाठवण्यात येणाऱ्या मॅसेजप्रमाणे काम करणा आहे. मात्र त्यासाठी समोरच्या व्यक्तीकडे इंटरनेट असणे गरजेचे आहे.

व्हिडीओ म्यूट

व्हॉट्सॲपवर कोणताही व्हिडीओ पाठवताना किंवा स्टेट्स ठेवताना व्हिडीओ म्यूट करण्याची सोय नाही. मात्र आता व्हॉट्सॲप अपडेट झाल्यावर तो तुम्हाला म्यूट करता येणार आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या कंपनी यावर काम करत आहे. लवकरच हे फिचर्स अपडेट केले जाणार आहे.

Read later

Read later हे फिचर्स व्हॉट्सॲपवरील Archived Chats चे अपडेट व्हर्जन आहे. यामुळे कोणतेही चॅट्स Read later या ठिकाणी Move केल्यानंतर व्हॉट्सॲप तुम्हाला त्या संबंधित चॅट्सचे नोटिफिकेशन पाठवणार नाही. विशेष म्हणजे या फिचर्ससोबत तुम्हाला vacation mode हे नवे फिचर्सही अपडेट केले जाणार आहे.

मिस्ड कॉल्स कधीही जाईन करता येणार

अनेकदा कामात असल्यावर व्हॉट्सअॅपवरील कॉल आपल्या लक्षात राहत नाही. मात्र जर आता तुम्हाला एखादा व्हिडीओ कॉल किंवा व्हॉईस कॉल आला असेल तर तो तुम्हाला काही वेळानंतर जाईन करता येणार आहे. मात्र यासाठी तो व्हिडीओ कॉल सुरु असायला हवा, ही ऐवढी अट असणार आहे.

व्हॉट्सॲप Insurance

येत्या काही दिवसात तुम्हाला व्हॉट्सॲपद्वारे Insurence ही खरेदी करता येणार आहे. व्हॉट्सॲपकडून लवकरच हेल्थ Insurence आणि मायक्रो पेन्शन प्रोडक्ट लाँच केले जाणार आहे. सुरुवातीला व्हॉट्सॲप SBI आणि HDFC या दोन बँकेचे इन्शुरन्स स्कीम पाठवणार आहे. (WhatsApp Update 6 New Features)

संबंधित बातम्या : 

WhatsApp मधील ‘या’ 5 दमदार फिचर्सचा वापर करायलाच हवा

येत्या 1 जानेवारीपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp बंद होणार?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.