Motorola चा नवा फोन इतका बारीकंय, इतका बारीकयं की काय सांगून कितका बारीकंय! एकदा बघाच
जगातला सगळ्यात बारीक फोस 144 Hz रिफ्रेश रेट देतो. गेमिंगसाठी हा फोन भारी असेल, असा दावा तज्ज्ञांनी केलाय.
मुंबई : मोबाईलच्या (Smartphone Mobiles) दुनियेतला एक नवा अवतार लवकरच ग्राहकांच्या भेटीला येतोय. वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल फोन्सच्या शौकिनांसाठी ही बातमी म्हणूनच खास आहे. कारण हा आता नव्यानं लॉन्च केला जाणारा मोटोरोलाचा एक फोन हा आतापर्यंतचा जगातला सगळ्या स्लिम अर्थात बारीक स्मार्टफोन (World’s Slimmest 5G Smartphone) असणार आहे. शिवाय हा फोन फाईव्ह जी (5G Smartphone) देखील असेल. आजच (12 मे) या फोनचं लॉन्चिंग झालं. मोटोरोलानं हा फोन साकारलाय. या फोनच्या सगळ्या खास बाबी जाणून घेणार आहोत. जगातल्या सगळ्यात बारीक स्मार्टफोनचं नाव आहे, मोटोरोल मोटो एज 30. जगात याच्या इतका बारीक फोन नाहीच आहे, असा दावा कंपनीनं केलंय. या मोबाईल फोनमध्ये 778 जी प्लस प्रोसेसर देण्यात आला. या फोनच्या बँक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यातील प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल आहे. तर फोनचं वजय 155 ग्रॅम इतकं आहे. या फोनची चर्चा सध्या फ्लिमकार्ट आणि इतर ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर रंगतेय.
जगातला सगळ्यात बारीक फोस 144 Hz रिफ्रेश रेट देतो. गेमिंगसाठी हा फोन भारी असेल, असा दावा तज्ज्ञांनी केलाय. शिवाय या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778 जी प्लस प्रोसेसरही आहे. 8 जीबीची रॅमेम आहे. 256 जीबी इंटरनल स्टोअरेज आहे. सोबत हा स्मार्टफोन एनरॉईन 12 बेस्ड माययूएक्स स्किनवर चालतो.
कॅमेरा कसाय?
50 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर असलेल्या या फोनमध्ये तीन कॅमेऱे लागले आहे. एक 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आहे. सेकंडरी कॅमेराही 50 मेगापिक्सल आहे असून या कॅमेरात अल्ट्रा वाईट लेन्स आहे. तर तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सल आहे. सेल्फीसाठी किंवा व्हिडीओ कॉलिंगसाठी देण्यात आलेला फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सल इतका आहे.
बॅटरी कशीए?
मोटोरोला मोटो एज 30 च्या बॅटरी बँकबाबत बोलायचं झालं, या फोनमध्ये 4020 MHची बॅटरी आहे. या फोनसोबत फास्ट चार्जिंगचा पर्यायही मिळतोय. 33w फार्स्ट चार्जिंग सह हा फोन टर्बोपॉवर फास्ट चार्जिंग देतो. हा फोन डॉल्बी एटमोस सपोर्टच्या सोबत येतो.
Get the power to #FindYourEdge with a fusion of sleek & modern design. The all-new #motorolaedge30 is just 6.79mm thin making it the World’s Thinnest 5G Smartphone. Launching on 12th May on @Flipkart, @RelianceDigital & leading retail stores.
— Motorola India (@motorolaindia) May 6, 2022
किंमत किती?
मोटोरोलाच्या या सगळ्यात लहान स्मार्टफोनची संभाव्य किंमत 30 हजार रुपये इतकी असण्याची शक्यता आहे. युरोपीयन बाजारात या मोबाईल फोनची किंमती 450 युरो म्हणजेच जवळपास 36 हजार 675 रुपये असेल, असं सांगितलं जातंय.