24/7 ब्लड प्रेशर मॉनिटरिंग, SpO2 सेन्सरसह Xiaomi Mi Band 6 लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फीचर्स

Xiaomi ने पुष्टी केली आहे की, Mi Band 6 नेक्स्ट जनरेशन Mi Notebook सोबत लॉन्च केला जाईल. एमआय नोटबुक आणि एमआय बँड 6 दोन्ही डिव्हाईस 26 ऑगस्ट रोजी लॉन्च केले जातील.

24/7 ब्लड प्रेशर मॉनिटरिंग, SpO2 सेन्सरसह Xiaomi Mi Band 6 लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फीचर्स
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 8:12 AM

मुंबई : Xiaomi ने पुष्टी केली आहे की, Mi Band 6 नेक्स्ट जनरेशन Mi Notebook सोबत लॉन्च केला जाईल. एमआय नोटबुक आणि एमआय बँड 6 दोन्ही डिव्हाईस 26 ऑगस्ट रोजी लॉन्च केले जातील. शाओमीने सोशल मीडिया पोस्टद्वारे या फिटनेस बँडची घोषणा केली आहे. शाओमीचे मुख्य व्यवसाय अधिकारी रघू रेड्डी यांनी इंडिया टुडेला सांगितले की, Mi Band 6 प्लॅनिंगनुसार लाँच केला जाईल. (Xiaomi confirms Mi Band 6 will launch on 26th august in India)

फिटनेस बँड सर्वात आधी मार्चमध्ये चीनमध्ये लाँच करण्यात आलं होतं. त्या काळात Mi 11 सीरीजचे स्मार्टफोनही लाँच करण्यात आले. अशा परिस्थितीत भारतातील अनेक युजर्स या उत्पादनाची वाट पाहत आहेत. शाओमीने पुष्टी केली आहे की Mi Band 6 भारतीय वेरिएंट SPO2 सेन्सरसह येईल आणि त्यात 30 स्पोर्ट्स मोड असतील. तसेच यात AMOLED डिस्प्ले असेल. हे सर्व फीचर्स ग्लोबल वेरिएंटमध्ये देखील उपस्थित होते, त्यामुळे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. Mi Band 6 बद्दल अधिक वैशिष्ट्ये Mi Smarter Living 2022 मध्ये उघड होतील.

फीचर्स आणि स्पेक्स

Mi Band 6 मध्ये 1.56-इंचांचा AMOLED टचस्क्रीन डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 326ppi पिक्सल डेन्सिटी आणि 450 निट्स पीक ब्राइटनेस आहे. फिटनेस बँडमध्ये 30 स्पोर्ट्स मोड सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये वॉकिंग, रनिंग, इनडोर ट्रेडमिल आणि सायक्लिंगचा समावेश आहे. Mi Band 6 मध्ये स्लीप ट्रॅकिंगसह 24/7 ब्लड प्रेशर मॉनिटरिंग, ब्लड ऑक्सिजन (SpO2) सेंसर आणि हार्ट-रेट मॉनिटरिंगची सुविधा आहे.

यात 125mAh ची बॅटरी असेल जी 14 दिवसांचा स्टँडबाय टाइम देईल, असा दावा केला जात आहे. बँड चार्ज करण्यासाठी दोन तास लागतात आणि ब्लूटूथ 5.0 चा सपोर्ट देण्यात आला आहे. हा बँड 50 मीटर पर्यंत वाटरप्रूफ देखील आहे. एमआय बँड व्यतिरिक्त, शाओमी इतर कॅटेगरीजमध्ये देखील उत्पादने लॉन्च करेल, अशी अपेक्षा आहे. यामध्ये Mi नोटबुक व्यतिरिक्त नवीन Mi TV, नवीन राउटर आणि सिक्योरिटी कॅमेरा समाविष्ट असू शकतो.

इतर बातम्या

आता iOS वापरकर्तेही खेळू शकतात बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया, डाऊनलोडसाठी गेम उपलब्ध

भारतात 5G ची मारामार, तिकडे LG कडून 6G टेस्टिंग, डेटा ट्रान्समिशन प्रक्रिया यशस्वीपणे पार

रिअलमीने लाँच केले रिअलमी जीटी स्मार्टफोन आणि स्लिम बुक लॅपटॉप, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Xiaomi confirms Mi Band 6 will launch on 26th august in India)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.